आधी विष घेतलं, नंतर स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठलं, पण निर्दयी पतीने पायऱ्यांवरच…, पोलिसाच्या पत्नीचा मृत्यू; पतीला अटक

नाशिकमध्ये पोलीस दलात कार्यरत असलेल्या पतीकडून स्वत:च्या पत्नीवर चारित्र्याच्या संशयातून आणि फ्लॅट दीराच्या नावावर करण्याच्या कारणातून सतत शारीरिक व मानसिक छळ होत असल्याचं समोर आलं आहे.

आधी विष घेतलं, नंतर स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठलं, पण निर्दयी पतीने पायऱ्यांवरच…, पोलिसाच्या पत्नीचा मृत्यू; पतीला अटक
Nashik Crime News

राज्यात हुंडाबळीला बळी ठरलेल्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून आतापर्यंत अनेक महिलांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. त्यामुळे राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. असं असताना सर्वसामान्यांचे रक्षण करणारा वर्दीतला रक्षक स्वतःच्या पत्नीच्या जीवासाठी भक्षक बनला आहे. नाशिकमधून एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पोलीस दलात कार्यरत असलेल्या पतीकडून स्वत:च्या पत्नीवर चारित्र्याच्या संशयातून आणि फ्लॅट दीराच्या नावावर करण्याच्या कारणातून सतत शारीरिक व मानसिक छळ होत असल्याचं समोर आलं आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, नराधम पोलीस पतीकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला आणि चारित्र्याच्या संशयाला कंटाळून पीडित विवाहित महिलेने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र जीव वाचवण्याची धडपड करत असताना महिलेने स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठले, पण तिच्या पतीने उपचारासाठी डिपॉझिट न भरता तिला रुग्णालयाच्या पायऱ्यांवरच सोडून पळ काढला. या अत्यंत मन सुन्न करणाऱ्या घटनेने नाशिक पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

हेही वाचा- चिमुकलीच्या जन्माने घरात आनंद! अवघ्या 8 दिवसांत कुटुंबावर दुःखाचा डोंगर; रुग्णालयात गेल्यानंतर नेमकं काय घडलं?

समोर आलेल्या माहितीनुसार, दीपाली अनिल पवार (वय 32) असे मृत विवाहितेचे नाव आहे. दीपाली जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नर्स म्हणून कार्यरत होती. तर पती अनिल हा सुरुवातीला एसआरपीएफ दौंड येथे आणि सध्या नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत आहे. तिने स्वतःच्या मेहनतीच्या कमाईतून अहिल्यानगर येथे एक फ्लॅट खरेदी केला होता. हा फ्लॅट दीर सुनील याच्या नावावर करण्यासाठी पती आणि सासरच्या मंडळींकडून तिच्यावर सतत शारीरिक व मानसिक छळ होत होता.

इतकचं नव्हे तर कामाच्या ठिकाणाहून फोन आल्यास पती तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना बेदम मारहाण करत असे. अनिलने दीपालीच्या पगाराचे एटीएम कार्ड देखील स्वतःकडे ठेवून घेतले होते. जेव्हा दीपालीने तिच्या 7 वर्षांच्या मुलाच्या शिक्षणासाठी पगाराचे कार्ड परत मागितले, तेव्हापासून तिचावरचा छळ अधिकच वाढला. याच जाचाला कंटाळून दीपालीने विष प्राशन केले.

मात्र त्यानंतर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी ती स्वतः गाडी चालवत रुग्णालय पोहचली. मात्र नराधम पतीने उपचारासाठी लागणारे पैसे भरण्यास साफ नकार दिला आणि दीपालीला रुग्णालयाच्या पायऱ्यांवर सोडून तिथून पळ काढला. दम्यान यासर्वप्रकरणाची दखल घेत सातपूर पोलीस ठाण्यात पती अनिल पवारसह सासरच्या 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पतीला नाशिक न्यायालयाने त्याला 9 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number