…अन् पोरगी ढसाढसा रडू लागली, देवाच्या गाभाऱ्यातच अल्पवयीन मुलीसोबत कामगाराचं संतापजनक कृत्य; पिंपरी-चिंचवडमध्ये माणुसकीला काळीमा

पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी परिसरात शिव मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर मेट्रोच्या पिलर उभारणीच्या कामावर कार्यरत असलेल्या एका कामगाराने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे.
Pimpri Chinchwad Crime
Pimpri Chinchwad Crime

पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी परिसरात शिव मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर मेट्रोच्या पिलर उभारणीच्या कामावर कार्यरत असलेल्या एका कामगाराने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे.

या घटनेची माहिती समोर आल्यानंतर निगडी पोलिसांनी संबंधित कामगाराला ताब्यात घेतले आहे. दरम्यान संपूर्ण घटना मंदिरातील कॅमेऱ्यात कैद झाली असून याचा सीसीटीव्ही फुटेज सर्वत्र व्हायरल झाला आहे. निगडी येथील एका मंदिरात अल्पवयीन मुलगी दर्शनासाठी आली होती. त्यावेळी गाभाऱ्यात ती एकटीच होती.

हेही वाचा- लग्नाचं आमिष देत हिंदू तरुणीवर अत्याचार, 70-80 तरुणींची फसवणूक, नालासोपारा प्रकरणावर भाजप नेत्याची हादरवणारी माहिती; 150 पेक्षा अधिक…

शिवलिंगाच्या पाया पडल्यानंतर ही मुलगी बाहेर जाण्यासाठी उठली. त्यावेळेस तेथे एक कामगार आला. त्याने तिला कोपऱ्यात ओढून तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने प्रतिकार करत मोठ्याने आवाज केला, ज्यामुळे संबंधित कामगाराने तिला सोडून तेथून निघून पळ काढला. या प्रकारानंतर मुलगी मंदिरातच उभी राहून ढसाढसा रडू लागली.

घटनेची माहिती परिसरात पसरताच स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन निगडी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत संबंधित कामगाराला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, निगडी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध योग्य त्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version