अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला, दिलजीत दोसांझ, दादर-बीकेसी-ऐरोलीतील शाळादेखील टार्गेटवर; धमकीच्या ई-मेलमध्ये धक्कादायक खुलासे

मुंबईतील महानगरपालिकेच्या महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी आली असून यात बॉलीवूडमधील या सेलिब्रेटींनाही परत धमकीचे मेल आला आहे.
amitabh bachchan diljit dosanjh threat mail
amitabh bachchan diljit dosanjh threat mail
मुंबई : मुंबईतील महानगरपालिकेच्या महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी आली असून यात बॉलीवूडमधील या सेलिब्रेटींनाही परत धमकीचे मेल आला आहे. मेगास्टार अमिताभ बच्चन आणि अभिनेता-गायक दलजीत दोसान यांच्या नावांचा या ई-मेलमध्ये समावेश आहे. अमिताभ बच्चन यांचा मुंबईतील
जलसा हा बंगला ग्रेनेडने उडवून देऊ, अशी धमकी मेलमध्ये दिली असल्याची माहिती मिळत असून सुप्रसिद्ध गायक आणि अभिनेता दलजीत दोसानलासुद्धा जीवे मारण्याची धमकी देणारा मेल पाठवण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई पोलीस आणि मुंबई सायबर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.
खलिस्तान नॅशनल आर्मीचे प्रतिनिधित्व करत असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने ई-मेलद्वारे मुंबई महापौर कार्यालयावर दुपारी ३:११ वाजता आणि एका शाळेत दुपारी १:११ वाजता बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिली आहे. तसेच, ३१ ऑक्टोबर रोजी ग्रेनेड हल्ले करण्याची आणि २७ नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्सवर बॉम्बस्फोट घडवण्याची धमकीही या ई-मेलमध्ये देण्यात आली आहे. ई-मेल पाठवणाऱ्याने खलिस्तान समर्थक घोषणा दिल्या असून, १९८४ मधील शीखविरोधी हिंसाचाराचा उल्लेख केला आहे. शीख समुदायाला लक्ष्य केल्याचा आरोप करत, त्याचा बदला म्हणून हे हल्ले करण्यात येणार असल्याचे ई-मेलमध्ये म्हटले आहे. मात्र, ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख स्वतंत्रपणे पडताळण्यात आलेली नाही. तसेच, या ई-मेलमध्ये करण्यात आलेल्या धमक्या अद्याप केवळ दावे असून, त्यांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.
हेही वाचा : BMC मुख्यालयात खळबळ! महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ई-मेल; पोलिसांसह बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल
मुंबईतील बीकेसी परिसरातील अमेरिकन शाळेला धमकीचा ई-मेल – 
* मुंबईतील बीकेसी परिसरात असलेल्या एका अमेरिकन शाळेला धमकीचा ई-मेल प्राप्त झाला आहे.
* या ई-मेलमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे.
* धमकीच्या ई-मेलमध्ये पंजाबशी संबंधित एका प्रकरणाचाही उल्लेख आहे.
* ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध मुंबई पोलीस घेत आहेत.
* मुंबई महानगरपालिकेलाही असाच एक ई-मेल प्राप्त झाला होता. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात कोणतीही संशयास्पद बाब आढळून आली नाही.
दरम्यान, महापालिका (BMC) कार्यालयात एक धमकीचा ईमेल प्राप्त झाला होता. तपासणी केली असता कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळली नसल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.
महत्त्वाचे अपडेट्स – 
– मुंबईच्या महापौर कार्यालयाला धमकीचा  ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती
– ३१ ऑक्टोबर आणि २७ नोव्हेंबरला स्फोट घडवण्याची धमकी दिल्याचा ई-मेलमध्ये दावा
– ३१ ऑक्टोबरला शाळेवर ग्रेनेड हल्ला करण्याची धमकी
– २७ नोव्हेंबरला महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात बॉम्बस्फोट घडवण्याचा उल्लेख
– ई-मेलमध्ये खलिस्तान आणि काही संघटनांच्या नावांचा उल्लेख
– धमकीच्या ई-मेलमुळे सुरक्षा यंत्रणांसमोर सतर्कतेचे आव्हान
– ई-मेलची सत्यता, पाठवणाऱ्याची ओळख आणि संभाव्य धोका तपासण्याची आवश्यक
विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान | Maharashtra Election

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version