भिवंडीतील कंपनीत भीषण स्फोट! आगीत 4 कामगार जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

भिवंडीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोनाळे गावाच्या हद्दीतील लक्ष्मी कंपाऊंड येथील कलर पॉलिश करणाऱ्या कंपनीत अचानक स्फोट होऊन भीषण आग लागली.

या दुर्घटनेत शहाजहान शेख, विनय कुमार वर्मा, नंदकिशोर यादव आणि नितीन कुमार हे 4 कामगार भाजून जखमी झाले असून, त्यापैकी 2 जण गंभीररित्या भाजले आहेत. जखमींना उपचारासाठी तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. कंपनीतील पॉलिश करणाऱ्या मशीनमध्ये स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेचा अधिक तपास भिवंडी तालुका पोलीस करत आहेत

हेही वाचा – डोंबिवलीत भरदिवसा थरार! घरात घुसून वृद्धेच्या गळ्याला हात अन् पुढे घडलं भयंकर; VIDEO

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version