टायगर श्रॉफनंतर आता प्रसिद्ध गायकाच्या घराबाहेर गोळीबार; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर, ‘या’ व्यक्तीवर संशय व्यक्त

या हल्ल्यामध्ये गायकाच्या घराबाहेर उभी असलेली स्कॉर्पिओ चारचाकी गाडी पूर्णपणे छिन्नविछिन्न झाली असून, या संपूर्ण थरारक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता पोलिसांच्या हाती लागले आहे.
टायगर श्रॉफनंतर आता प्रसिद्ध गायकाच्या घराबाहेर गोळीबार; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर, ‘या’ व्यक्तीवर संशय व्यक्त
singer Abhishek Singh house firing

महाराष्ट्राच्या मनोरंजन विश्वात खळबळ उडवून देणारी एक धक्कादायक घटना समोर आली असून, काही दिवसांपूर्वी अभिनेता टायगर श्रॉफच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर आता एका प्रसिद्ध गायकाला लक्ष्य करण्यात आले आहे. प्रसिद्ध गायक अभिषेक सिंह यांच्या निवासस्थानाबाहेर काही अज्ञातांनी पहाटेच्या सुमारास जोरदार गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये गायकाच्या घराबाहेर उभी असलेली स्कॉर्पिओ चारचाकी गाडी पूर्णपणे छिन्नविछिन्न झाली असून, या संपूर्ण थरारक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता पोलिसांच्या हाती लागले आहे.

गाडीवर तब्बल 5 राऊंड फायर

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना भल्या पहाटे 4 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास घडली. जेव्हा हा गोळीबार झाला, तेव्हा गायक अभिषेक सिंह आणि त्यांचे कुटुंब घरामध्ये गाढ झोपले होते. अचानक झालेल्या गोळ्यांच्या प्रचंड आवाजामुळे घरातील सर्वजण जागे झाले आणि त्यांनी तातडीने बाहेर धाव घेतली. बाहेर आल्यानंतर त्यांच्या असे निदर्शनास आले की, हल्लेखोरांनी त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीवर तब्बल 5 राऊंड फायर केले असून, गाडीचे प्रचंड नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले.

हेही वाचा – माणुसकीला काळिमा! 63 वर्षीय आईच्या डोक्यात लोणच्याची बरणी अन् लोखंडी खुरप्याने वार; येवतीत खळबळ

गायकाची सोशल मीडियावर पोस्ट

या प्राणघातक हल्ल्यानंतर गायक अभिषेक सिंह यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करत संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “पोलिसांकडून आम्हाला सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, आमचा संशय खरा ठरला आहे. रात्रीच्या वेळी अशा प्रकारे घरात झोपलेल्यांवर आणि मालमत्तेवर हल्ला करणे अतिशय चुकीचे आणि निंदनीय आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, या प्रकरणात पोलीस कठोर कायदेशीर कारवाई करतील.” तसेच, या संपूर्ण हल्ल्यामागे ‘शिवकुमार विक्कू’ नावाच्या व्यक्तीचा हात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

वाढत्या गुन्हेगारीमुळे सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच अभिनेता टायगर श्रॉफच्या घराजवळ अशाच प्रकारची गोळीबाराची घटना घडली होती, ज्यातून तो थोडक्यात बचावला होता. आता पुन्हा एकदा प्रसिद्ध गायकाला टार्गेट केल्यामुळे मनोरंजनसृष्टीत भीतीचे वातावरण पसरले आहे. सलग घडणाऱ्या अशा घटनांमुळे कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, लवकरच आरोपींना जेदणात पकडले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version