Divya Shinde: निवृत्त डॉक्टरच्या घरात घुसून 5 लाखांची मागणी अन् मारहाण! दिव्या शिंदेविरोधात गुन्हा दाखल; पुण्यात खळबळ

पुण्यातील ६५ वर्षीय निवृत्त डॉक्टरच्या घरात घुसून मारहाण आणि पाच लाखांच्या खंडणीचा आरोप दिव्या शिंदेसह अन्य जणांवर करण्यात आला आहे. काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मारहाणीच्या आरोपावरून दिव्या शिंदेविरोधात गुन्हा दाखल
मारहाणीच्या आरोपावरून दिव्या शिंदेविरोधात गुन्हा दाखल

पुणे : सोशल मीडियावर रीलस्टार म्हणून ओळखली जाणारी आणि ‘बिग बॉस मराठी’मुळे चर्चेत आलेली दिव्या शिंदे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पुण्यातील एका ६५ वर्षीय निवृत्त डॉक्टरच्या घरात घुसून मारहाण करणे, धुडगूस घालणे आणि पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप तिच्यासह इतर काही जणांवर करण्यात आला आहे. या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

तक्रारीनुसार, डॉ. विद्याधर गायकवाड हे पुणे कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलचे माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी असून ते ‘करूणादीप फाउंडेशन’शी संबंधित आहेत. या संस्थेच्या वतीने पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात ‘कला आविष्कार महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीशी संबंधित मोबदल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

हेही वाचा: Onkar Bhojne : ‘नक्कीच याचं उत्तर देईन…’ दिग्दर्शक मिलिंद कवडेंच्या गंभीर आरोपांवर ओंकार भोजनेचा पलटवार, म्हणाला…

तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की, दिव्या शिंदे आणि तिच्यासोबत आलेल्या काही जणांनी डॉक्टरांकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. ही रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर संबंधितांनी डॉक्टरांच्या घरात प्रवेश करून मारहाण केली तसेच घरात तोडफोड आणि गोंधळ घातला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

या प्रकरणात दिव्या शिंदेसह अण्णा उर्फ आप्पा ढमढेरे आणि इतर आठ ते दहा जणांविरोधात काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे तपास सुरू केला असून घटनेतील प्रत्येक पैलूची चौकशी केली जात आहे. संबंधित परिसरातील पुरावे, साक्षीदारांची माहिती आणि इतर बाबींची पडताळणी करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा: Vicky Kaushal Love And War First Look: ‘नजरें मिलेंगी, लेकिन हटेंगी नहीं…’; ‘लव्ह अँड वॉर’मधून विकी कौशलचा आक्रमक लूक समोर

दिव्या शिंदे यांचे नाव यापूर्वीही चर्चेत आले होते. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सहस्पर्धकांना धमकावल्याच्या प्रकारानंतर फेब्रुवारी 2026 मध्ये त्यांना शोमधून बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर आता पुण्यातील या नव्या प्रकरणामुळे त्यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे.

दरम्यान, ज्येष्ठ डॉक्टरच्या घरात घुसून कथित मारहाण आणि खंडणी मागितल्याच्या आरोपामुळे या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. या प्रकरणात नेमकी कायदेशीर कारवाई काय होते आणि तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version