बुलढाणा जिल्ह्यातून एक थरारक घटना समोर आली आहे. चिखली तालुक्यातील सोमठाणा गावात जमिनीच्या वादातून एका व्यक्तीने आपल्याच कुटुंबातील तिघांची अमानुषरित्या हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
आरोपी दीपक सुरडकर याने जन्मदात्या आई, सख्खा भाऊ आणि पुतण्याला धारदार चाकूने भोसकून ठार केल्याचा आरोप आहे. या घटनेत सरस्वती सुरडकर (वय 70), संजय सुरडकर (वय 55) आणि रणजीत सुरडकर (वय 25) या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
हेही वाचा – ज्या तुरुंगात महिला जेलर म्हणून रुबाब मिरवला, तिथेच कैदी म्हणून रवानगी; नेमकं काय घडलं?
प्राथमिक माहितीनुसार, शेतीच्या वादातून हे तिहेरी हत्याकांड घडले असावे असा संशय व्यक्त केला जात आहे. घटना घडल्यानंतर आरोपी दीपक सुरडकर हा फरार झाला असून चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.