बुलढाण्यात रक्तरंजित थरार! शिंदेसेनेत आणि अजित पवार गटात तुंबळ हाणामारी; दोघांचा मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा शहरातून मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. देऊळगाव राजा इथं शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीमध्ये तुफान हाणामारी झाली आहे.

बुलढाण्यात रक्तरंजित थरार! शिंदेसेनेत आणि अजित पवार गटात तुंबळ हाणामारी; दोघांचा मृत्यू
Buldhana

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा शहरातून मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. देऊळगाव राजा इथं शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. यावेळी दोन गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत दोन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या धक्कादायक घटनेने बुलडाण्यातील राजकारण चर्चेता आलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा परिसरात एका कव्वालीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी गटाचे नेतेमंडळी उपस्थित होते. दरम्यान देऊळगाव राजा शहरात रात्रीच्या सुमारास शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या गटामध्ये कव्वालीच्या कार्यक्रमामध्ये बसण्याच्या जागेवरून आधी जोरदार बाचाबाची झाली, बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले.

हेही वाचा- हिंगोलीत फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; 2 जणांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जण जखमी

त्यानंतर दोन्ही गटातील नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक अनवर शेख आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी संबंधित कार्यकर्ता आरिफ शेख यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. तसेच इतर 7 जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.

विशेष म्हणजे, पोलीस ठाण्यासमोरच हा वाद विकोपाला गेल्याचे सांगितले जात आहे. इतकचं नव्हे तर यावेळी शस्त्रांचीही वापर झाल्याचं सांगितलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number