लग्नाचं आमिष देत हिंदू तरुणीवर अत्याचार, 70-80 तरुणींची फसवणूक, नालासोपारा प्रकरणावर भाजप नेत्याची हादरवणारी माहिती; 150 पेक्षा अधिक…

नालासोपारा येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नालासोपाऱ्यात हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

लग्नाचं आमिष देत हिंदू तरुणीवर अत्याचार, 70-80 तरुणींची फसवणूक, नालासोपारा प्रकरणावर भाजप नेत्याची हादरवणारी माहिती; 150 पेक्षा अधिक…
Nalasopara Crime

नालासोपारा येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नालासोपाऱ्यात हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपी तरुणाने तब्बल 70 ते 80 हिंदू तरुणींना फसवलं असून त्यांच्यासोबत गैरप्रकार केला आहे. या घटनेमुळे नालासोपारा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नालासोपारा येथील आरीफ आयुब शेख या 22 वर्षीय तरुणाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

एफआयआरमधील तक्रारीनुसार, 9 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी व्यायामासाठी गेलेल्या एका तरुणाला संबंधित तरुणाबाबत काही माहिती मिळाली. संबंधित व्यक्तीने हिंदू तरुणींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे तसेच काही महिलांचे लैंगिक अत्याचाराशी संबंधित व्हिडिओ असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारीनुसार, संबंधित तरुणाच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडिओ आढळल्याचा दावा करण्यात आला. हे व्हिडिओ व्हॉट्सॲप स्टेटसवर प्रसारित केल्याची माहितीही तक्रारीत देण्यात आली आहे. तसेच पीडित महिलांचे व्हिडिओ हटवण्याची मागणी करण्यात आल्याचे नमूद आहे.

हेही वाचा- गोंदियातील थरारक घटना! चघळलेल्या सुपारीवरून लागला आरोपीचा छडा; 81 वर्षीय महिलेला दागिन्यांसाठी शेजाऱ्यानचं संपवलं

इतकचं नव्हे एका व्यायाम शाळेत मित्रांसोबत असताना आरोपीची पीडित तरुणीशी ओळख झाली. आरिफ अबू शेख असे आरोपी तरूणाचे नाव असून तरुणाने पीडित तरुणीची ओळख वाढवून तिला प्रेमाच्या जाळ्यात फसवले. तसेच तिला लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर वारंवार अत्याचार केला असल्याचे समोर आले. या प्रकरणात संबंधित तरुणाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तक्रारदार शिव उपाध्याय यांनी केली आहे.

प्रकरणातील आरोपांची सत्यता, व्हिडिओंचे स्वरूप आणि पोलिसांकडून करण्यात आलेली पुढील कारवाई याबाबत अधिकृत तपशील समोर येणे बाकी आहे. नालासोपाऱ्यात लव्ह जिहादच्या घटनेचा आरोपानंतर भाजप नेते किरीट सोमय्या नालासोपाऱ्याला रवाना झाले असून किरीट सोमय्या नालासोपारा पोलिस ठाण्यात थोड्याच वेळात पोहोचणार आहेत. तसेच किरीट सोमय्या नालासोपाऱ्यात लव्ह जिहादच्या घटनेबाबत पोलिसांकडून संपूर्ण माहिती घेणार आहेत.

हेही वाचा- गडचिरोलीत खळबळ! आई-वडिलांनी घरी नेलं नाही; 14 वर्षीय विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

देवाभाऊंच सरकार, कोणीलाही माफी नाही-राम कदम
दरम्यान या प्रकरणावर भाजप नेते राम कदम यांनी माहिती देत म्हटलं की, “नालासोपाऱ्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. पोलिसांनी शेख नावाच्या तरुणाला अटक केलं आहे. एका महिलेची तक्रार आहे अत्याचार करत बलात्कार झाला तिला फसवल. अश्लील 150 पेक्षा अधिक व्हिडिओ काढले गेले. नेमक खर प्रकरण काय आहे. लावजीहादचा प्रकार आहे का महिला भगिनी गरबा खेळायला जातात त्याबाबत आक्षेपार्य विधान त्याने केली या स्वरूपाचा आरोप आहे. पोलिस चौकशी करत आहे. देवाभाऊंच सरकार आहे कोणीलाही माफ केलं जाणार नाही. लव्ह जिहाद सारखे प्रकार खपवू घेतले जाणार नाही. जो कोणी आरोपी आहे व त्याचे साथीदार आहे त्याची चौकशी करून कठोर शिक्षा केली जाईल.”

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर, पाहा जय महाराष्ट्र न्यूज

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number