मालमत्तेवरून वाद विकोपाला; एकाच वेळी 5 जणांसोबत घडला थरारक प्रकार, घटनास्थळी पोहोचताच संपूर्ण यंत्रणा सुन्न

Crime News : आसाममधून एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. मालमत्तेच्या वादातून घडलेल्या गंभीर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली असून, नेमका वाद कसा पेटला आणि घटनेमागे काय कारण आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मालमत्तेवरून वाद विकोपाला; एकाच वेळी 5 जणांसोबत घडला थरारक प्रकार, घटनास्थळी पोहोचताच संपूर्ण यंत्रणा सुन्न
Crime News

जमिनीच्या वादातून कुटुंबात किंवा ओळखीच्या लोकांमध्ये भांडण होणे हे सामान्य आहे, पण सध्या समोर आलेली ही घटना अंगावर काटा आणणारी आहे. जिथं आसाममध्ये मालमत्तेच्या वादातून झालेल्या अंदाधुंद गोळीबारात तब्बल 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर एक जण गंभीर जखमी झालेला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मालमत्तेच्या वाटणीवरुन सुरु असलेल्या वादाचे रुपांतर या थरारक घटनेत झाले. स्थानिकांनी तातडीने ही माहिती पोलिसांना दिली असून त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला रुग्णालयात दाखल केले. सध्या या प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेतले आहे. पण या प्रकरणात एकाच वेळी पाच जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number