घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर एक धक्कादायक घटना घडली आहे. आई-वडिलांमधील वाद विकोपला गेल्याने, पित्याने पोटच्या नऊ महिन्यांच्या बाळाला स्कायवॉकवरून खाली फेकल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेत बाळ गंभीर जखमी झाले असून, त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमके प्रकरण काय?
ही घटना काल, 25 ऑक्टोबर रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेरील स्कायवॉकवर घडली. पती-पत्नीमध्ये भांडण सुरू होते, वाद विकोपाला गेल्यानंतर रागाच्या भरात पतीने आपल्या नऊ महिन्यांच्या बाळाला खाली फेकले. या घटनेत बाळ गंभीर जखमी झाले असून त्याला तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, घटनास्थळी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याला आधी राजवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी वडिलांना अटक केली असून, अधिक तपास पोलीस करत आहेत.
महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी एका क्लिकवर-
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.