चिमुकल्याच्या येण्यामुळे ती आनंदी होती. मनात आपल्या बाळासाठी अनेक स्वप्न रंगवत होती. नव्या आयुष्याची सुरुवात करण्याची तिची एक आशा होती. मात्र, या सर्व स्वप्नांना भीषण वळण मिळालं. गुजरातमध्ये एका गर्भवती महिलेच्या मृत्यूने मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणात तिच्या पतीसह दिरावर गंभीर संशय व्यक्त केला आहे. धक्कादायक म्हणजे, सुरुवातील हा सर्व प्रकार आत्महत्येचा असल्याचं सांगितलं होत. मात्र, तपासात वेगळेच पुरावे समोर येऊ लागले.
पोटात बाळ असताना पतीचाच क्रूर डाव
गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील महुधा येथे अरुणाबेन यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी त्यांचे पती मितुल सोढा आणि दीर विपुल सोढा यांना ताब्यात घेतलं. खंर तर शेतीसाठी वापरला जाणाऱ्या द्रवरुप नॅनो युरियाचं जबरदस्ती सेवन करायला लावल्याने त्यांचा मृत्यू झाला, अशा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मृत महिला यांचा भाऊ विरेंद्रसिंह यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरु केला. पती, सासू कैलाशबेन, दीर आणि नणंद यांच्याकडून त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचा आरोप तक्रारीत केलेला आहे. एवढंत नव्हे तर महिलेच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने वारंवार कुटुंबात वाद होत असतं, असेही तक्रारीत नमूद करण्यात आलेलं आहे.
घटने दिवशी नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी रात्री अरुणाबेन आणि मितुल यांच्यामध्ये जोरदार भांडण झाले होते. त्यानंतर मितुलने पत्नीच्या या वादानंतर मितुलने पत्नीच्या आत्महत्येच्या प्रकरणात पतीची काय जबाबदारी असते, याची माहिती इंटरनेटवर शोधली. त्यानंतर अरुणाबेन यांना जबरदस्तीने धरुन नॅनो युरिया पाजण्यात आला, असा संशय आहे. या गुन्ह्यात घरातील अजून कोण सहभागी आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत.
पत्नीच्या मृत्यूला आत्महत्या असल्याचा बनाव हा केला गेला, अशा संशय पोलिसांना व्यक्त केला आहे. घटनास्थळावरुन पोलिसांनी नायलॉनची दोरी, मोबाईल फोन, ब्लेड आणि काही इतर वस्तू जप्त केल्या आहेत. सध्या पोलीस पुढील तपास करत असून लवकरच अंतिम सत्यता समोर येईल.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update