टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणात आरोपींची संख्या 10 वर असून 8 आरोपीं ताब्यात घेतल्यानंतर आणखी 2 आरोपी अटकेत आले आहेत. यात समीर आणि जतीन यांना अटक केली आहे. टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणातील 10 आरोपींपैकी 7 आरोपी हरियाणातील सोनीपतचे असल्याची प्रथमिक माहिती आहे.
कोंढवा पोलिसांनी सराईत गुन्हेगाराकडून 12 मोबाईल आणि 3 दुचाकी जप्त केले आहेत. चोरीच्या गुन्ह्यातील 24 वर्षीय आरोपी सोहेल इलाही दखणी याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यावेळी गोपनीय माहितीच्या आधारे कोंढव्यातील पॅराडाईज इन लॉजसमोरून आरोपीला ताब्यात घेतले.
महाविद्यालयीन परिसरात छेडछाड आणि रोडरोमिओंच्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर बावधन पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे. यात शाळा-महाविद्यालय परिसरात नियमित पोलीस गस्त वाढवण्याची आणि पोलीस मार्शल तैनात करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान विद्यार्थिनींची छेडछाड प्रकरणातील सहा आरोपींवर 24 तासांत कारवाई केल्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांचा युवा सेनेकडून सत्कार करण्यात आला. विद्यार्थिनींना निर्भयपणे शिक्षण घेता यावे, यासाठी ठोस सुरक्षा उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रविराज सोसायटीतील नागरिकांची अंगठी चुकून ओल्या कचऱ्यात गेली होती. दुपारी 12 वाजता माहिती मिळताच पूजा ढावरे यांनी अर्धा तास कचऱ्यात शोध घेत अंगठी शोधली आणि आईच्या मदतीने अंगठी शोधून नागरिकांना सुपूर्द केली.
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील खराशी येथील महाप्रसादातून झालेल विषबाधेमुळे ग्रामीण रुग्णालय पालांदूर हे फुल झाले असून उपचारासाठी एका बेड वर दोन ते तीन रुग्णांचा उपचार सुरू आहे. तर गंभीर रुग्णांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून या घटनेमुळे आरोग्यव्यवस्था युद्ध पातळीवर कामाला लागलेली आहे.या घटनेत 200 च्या वर नागरिकांना विषबाधा झाली असल्याचे पुढे आले आहे.
वाशिमच्या मालेगाव शहरात दुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यान टिपू सुलतान चौक परिसरात मिरवणूकीवर दगदफेक झाल्याने तणाव निर्माण झाले. मिरवणुकी दरम्यान उधळलेला गुलाल विशिष्ट समाजातील व्यक्तीच्या घरावर गेल्याने दुर्गा मंडळ आणि काही तरुणांमध्ये बाचाबाची झाली होती. जमावाने काही दुचाकी आणि अन्य वाहनांची तोडफोड केली. दगडफेक करणाऱ्या आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी पोलीस स्टेशनमध्ये मोठा जमाव जमा झाला आहे.
टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणात आरोपींची संख्या 10 वर असून 8 आरोपीं ताब्यात घेतल्यानंतर आणखी 2 आरोपी अटकेत आले आहेत. यात समीर आणि जतीन यांना अटक केली असून समीरने मुख्य आरोपींचा अनिल पंडितशी संपर्क घडवून आणल्याचा आरोप आहे. तर जतिनने गोळीबारासाठी शस्त्रांची व्यवस्था केल्याचा आरोप आहे. आरोपींचे सोनीपत कनेक्शन उघड झाले असून टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणात हरियाणातील सोनीपत येथील आरोपींची भूमिका तपासाच्या केंद्रस्थानी आली आहे.