दोन मुलांना वाऱ्यावर सोडून पती-पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल; खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून गळफास घेतल्याचा महिलेल्या भावाचा आरोप

श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर येथील पती-पत्नीने सावकाराच्या जाचाला कंटाळून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

दोन मुलांना वाऱ्यावर सोडून पती-पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल; खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून गळफास घेतल्याचा महिलेल्या भावाचा आरोप
shrirampur crime news

जयेश सावंत, प्रतिनिधी 

श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर येथील पती-पत्नीने सावकाराच्या जाचाला कंटाळून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी रात्री राहत्या घरात साडीने गळफास घेऊन पिसाळ दाम्पत्याने आपले जीवन संपवले आहे. खाजगी सावकारांवर कारवाई करून न्याय द्यावा, अशी मागणी आता त्यांच्या नातलगांकडून होत आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर येथील बाळासाहेब पांडुरंग पिसाळ आणि कीर्ती बाळासाहेब पिसाळ या पती-पत्नीने सावकाराच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आपले जीवन संपवले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सावकारांचा तगादा आणी वसुलीसाठी धमकावणं सुरू असल्याने बाळासाहेब पिसाळ अस्वस्थ झालेले होते. त्यांना एक दहा वर्षाचा मुलगा आणी नऊ वर्षाची मुलगी आहे. खासगी सावकारांच्या जाचामुळे आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप असून संबंधित सावकारांवर कारवाई करावी आणी कुटुंबाला न्याय द्यावा, आशी मागणी विवाहितेचा भाऊ गणेश वाडीतके यांनी केली आहे.

हेही वाचा : खासगी शाळेत हृदयद्रावक घटना! छत कोसळून 27 विद्यार्थ्यांचा मृत्यू; अनेक विद्यार्थी गंभीर जखमी

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number