धक्कादायक! प्रेयसीचा विवाह ठरला, संतापलेल्या प्रियकराने तिला खोल दरीत ढकलून दिलं; कोल्हापूर हादरलं

कोल्हापुरात एका प्रेमाचा थरारक शेवट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात प्रेयसीचा विवाह ठरला या रागातून प्रियकराने तरुणीचे अपहरण करून तिला दरीत ढकलून दिले आहे.
Kolhapur Crime
Kolhapur Crime

कोल्हापुरात एका प्रेमाचा थरारक शेवट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात प्रेयसीचा विवाह ठरला या रागातून प्रियकराने तरुणीचे अपहरण करून तिला दरीत ढकलून दिले आहे. या घटनेत प्रेयसी जागीच ठार झाली असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच या घटनेमुळे तरुणीच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा- नवरात्रीच्या तयारीत शोककळा! देवीची मशाल ज्योत घेऊन येणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू

समोर आलेल्या माहितीनुसार, कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील शिवडाव नाईकवाडी येथील तरुणी तरन्नुम नाईक ही अभियांत्रिकी शिक्षण घेत होती. आरोपी प्रियकर श्रीपाद वडर याच्याोबत तिचं प्रेमप्रकरण सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान तिचा विवाह ठरला होता. मात्र आरोपी श्रीपाद वडर याने संतापाच्याभरात तरन्नुमचं अपहरण केलं आणि तिला दरीत ढकलून दिल, ज्यात तिचा मृत्यू झाला.

या प्रकरणानंतर भुदरगड पोलिसांनी तपास सुरू करत आरोपी श्रीपाद वडर याला अटक केली आहे. यादरम्यान पोलिसांकडून करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. भुदरगड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. प्रेमप्रकरणातून तरुणीचा जीव गेल्याच्या या घटनेने कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version