माणुसकीला काळिमा! 63 वर्षीय आईच्या डोक्यात लोणच्याची बरणी अन् लोखंडी खुरप्याने वार; येवतीत खळबळ

जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जेवण बनवून न दिल्याच्या कारणावरून मुलाने जन्मदात्या आईला संपवले.

माणुसकीला काळिमा! 63 वर्षीय आईच्या डोक्यात लोणच्याची बरणी अन् लोखंडी खुरप्याने वार; येवतीत खळबळ
jalgaon crime

जळगाव : जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जेवण बनवून न दिल्याच्या कारणावरून मुलाने जन्मदात्या आईला संपवल्याची घटना बोदवड तालुक्यातील येवती येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अलकाबाई पुरुषोत्तम वाघ, वय 63 वर्षे, असे मृत महिलेचे नाव आहे. त्या येवती येथे मुलगा गणेश वाघ याच्यासोबत राहत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार रविवार, 25 ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे 5 वाजता ही घटना घडली. आईने जेवण बनवून न दिल्याच्या रागातून संशयित गणेश वाघ याने झोपेत असलेल्या आईच्या डोक्यावर लोणच्याची बरणी आणि लोखंडी खुरप्याने वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात अलकाबाई यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित मुलाला अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा : रस्त्यावर पॅरालिसिसचं नाटक, इंजेक्शन काढताच सगळा अभिनय संपला; पुढे जे घडलं ते भन्नाट

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number