रस्त्यावरुन जात असताना आपल्याला दररोज भिक मागणाऱ्या व्यक्ती दिसतात. काही जणांना आपण माणुसकीच्या नात्याने मदतही करतो. मात्र, कधी कधी याच मदतीच्या नावाखाली असा काही प्रकार समोर येतो, की पाहणारेही नागरिक थक्क होतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ चर्चेत आलेला आहे. या व्हिडिओ एक व्यक्ती पॅरालिसिस झाल्यासारखं भासवत रस्त्यावर बसलेली दिसते. मात्र, एका व्यक्तीने केलेल्या कृत्यानंतर जे घडलं, ते पाहून तिथे एकच धापवळ उडाली. आता या सर्व व्हिडिओची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.
नेमकं व्हिडिओत काय घडलं?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला बसून भीक मागताना सुरुवातील दिसत आहे. त्याची अवस्था पाहून एक तरुण त्याच्याजवळ जातो आणि माणुसकीच्या नात्याने त्या व्यक्तीच्या तब्येतीची चौकशी करतो, त्याला पॅरालिसिस कसा झाला, डॉक्टरांना दाखवले का शिवाय कुठे सध्या उपचार घेत आहात, असे प्रश्न विचारु लागतो. भिकारी हा सुरुवातीली उडवाउडवीची उत्तरे देतो. त्यावरुन विचारत असलेल्या तरुणाला त्याच्या बोलण्यात काहीतरी संशय असल्याचा अंदाज येतो.
हेही वाचा – रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! कमी खर्चात लाखोंचं विमा संरक्षण; काय आहेत अटी?
इंजेक्शन काढताच भिकाऱ्याची हवा टाइट
तरुण अनेक प्रश्न उपस्थित करतो. मात्र, भिकारी आपले नाटक शेवटपर्यंत सुरुच ठेवतो. त्यानंतर व्हिडिओ बनवत असलेला तरुण काही क्षणात शक्कल लढवतो. तरुण खिशातून एक इंजेक्शन काढतो आणि भिक मागत असलेल्या व्यक्तीला म्हणतो, ”हे इंजेक्शन दिले की तू लगेच बरा होऊन जाईल,” अखेर इंजेक्शनचे नाव ऐकताच सर्व परिस्थितीच क्षणात बदलून जाते.
"Paralyzed" Beggar Runs at Full Speed After Being Offered Treatment for Paralysis. https://t.co/7sDuOlM5f3 — WarMonitor (@WarMonitorINTL) October 26, 2026
व्हिडिओमध्ये पाहिले, जो भीक मागत असलेला व्यक्ती उठता-बसता येत नसल्याचे नाटक करत होता. तो अवघ्या काही क्षणात उभा राहिला आणि तेथून पळ काढतो. त्या व्यक्तीची ही धावपळ पाहून व्हिडिओ बनवत असलेला तरुणही थक्क झाला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून ‘एक्स’वर शेअर करण्यात आलेला आहे. परंतू नेमक्या कोणत्या ठिकाणाचा व्हिडिओ आहे ते समजू शकले नाही.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निकाल | Graduates Constituency Election Results