चहात साखर कमी म्हणून ग्राहक संतापला! चहावाल्याला बेदम मारहाण; पोलिसांकडून अद्याप कारवाई नाही

मुंबईतील जोगेश्वरीतून चहात साखर कमी असल्याच्या कारणावरून चहावल्याला गंभीर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

चहात साखर कमी म्हणून ग्राहक संतापला! चहावाल्याला बेदम मारहाण; पोलिसांकडून अद्याप कारवाई नाही
Jogeshwari News

चहात साखर कमी असल्याच्या कारणावरून चहावल्याला गंभीर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील जोगेश्वरी पश्चिमेतील ओशिवरा येथील आनंद नगर परिसरातील ही घटना असून, सुन्नी मशिदीबाहेर चहा विक्रेत्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, गुलाम मोहम्मद नईम असे गंभीर जखमी झालेल्या चहा विक्रेत्याचे नाव आहे. चहातील साखरेवरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले, या मारहाणीत मोहम्मद नईम यांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. तर जखमी चहा विक्रेत्याला उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा- समृद्धी महामार्गावर दोन भीषण अपघातांचा थरार! एका अपघातात एर्टिगाचा चक्काचूर, तर दुसऱ्यात टायर फुटल्याने…

तसेच बटियारा नन्नू आणि त्याच्यासोबत असलेल्या काही जणांवर मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेबाबत पोलिसांची अधिकृत प्रतिक्रिया आणि कारवाईची सद्यस्थिती समोर येणे बाकी आहे.

संपूर्ण घटना घडल्यानंतर पोलिसांनी अद्याप कारवाई केली नसल्याचा पीडित पक्षाचा आरोप आहे. त्यामुळे ओशिवरा पोलिसांच्या कारवाईबाबत पीडित पक्षाकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर संबंधित प्रकरणाचा तपास आणि संबंधितांवरील कारवाईबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number