मावळ : पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे मोबाईलवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून 16 वर्षीय मुलावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘King Is Back’ असे मोबाईल स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून हा वाद झाल्याचे सांगितले जात आहे. हल्लेखोरदेखील अल्पवयीन असल्याचे समजते. तीन महिन्यांपूर्वी MIDC हद्दीत एका हत्येच्या गुन्ह्यातील अल्पवयीन आरोपी सुधारगृहातून बाहेर आला. त्याच्यासोबत फोटो काढून king is back असा स्टेट्स ठेवला. या रागातून तीन महिन्यांपूर्वी मृत पावलेल्या तरुणाच्या मित्रांनी हा हल्ला केला. काल रात्री ही घटना शिवाजी चौक परिसरातील एका कपड्याच्या दुकानात घडली. स्टेट्स ठेवणारा मुलगा या दुकानात कामाला होता. त्या दुकानात घुसून तीन जणांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. हल्ल्यात मुलगा जखमी झाला असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तळेगाव पोलिसांनी दिली. त्यानंतर काही तासांत हल्लेखोर अल्पवयीन आणि ते ज्या गाडीतून पळाले त्याच्या चालकालाही ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.