आधी धारदार शस्त्राने वार, नंतर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न; उरणमध्ये गुन्हेगारीचा थरार

जुन्या वादातून तरुणावर कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार करत, अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उरणमधील चिरनेर परिसरात घडली आहे.

आधी धारदार शस्त्राने वार, नंतर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न; उरणमध्ये गुन्हेगारीचा थरार
Crime News

जुन्या वादातून तरुणावर कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार करत, अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उरणमधील चिरनेर परिसरात घडली आहे. या प्रकरणी उरण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या 24 तासांच्या आत दोन आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुण मोटारसायकलवरून घरी जात असताना आरोपींनी त्याचा पाठलाग करून रस्त्यात अडवले. त्यानंतर त्याच्या डोक्यावर पाच ते सात वार करून त्याला खाली पाडले. एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून आग लावत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा- हृदयद्रावक! ‘आम्हाला एकमेकांपासून कधीही वेगळं करू नका’; भावूक व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर ‘त्या’ जोडप्याचा रेल्वे रुळावर मृतदेह

या घटनेप्रकरणी 22 ऑक्टोबर रोजी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे नवी मुंबई परिसरातून दोन्ही आरोपींना 24 तासांच्या आत अटक करण्यात आली.

दोन्ही आरोपींना 27 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास उरण पोलीस करत आहेत. जुन्या वादातून थेट जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या उरणमधील या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number