धक्कादायक बातमी! माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जीवर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न; आरोपी महिलेच्या हातात…

राज्यासह देशातील बड्या नेत्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे.

धक्कादायक बातमी! माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जीवर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न; आरोपी महिलेच्या हातात…

राज्यासह देशातील बड्या नेत्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे.

ही घटना काल मंगळवारी कालीघाट येथे घडली. ममता बॅनर्जी कालीघाट येथील दुर्गा पूजा मंडपाचे उद्घाटन करण्यासाठी आपल्या घरातून पायी जात होत्या, त्यावेळी एका अज्ञात महिलेने अचानक त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

मिळालेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी रस्त्यावरून चालत जात असताना ही महिला अचानक त्यांच्यासमोर आली. ममता बॅनर्जीवर चालून जाण्याचा प्रयत्न केला, हल्लेखोर महिलेच्या हातात चाकू असल्याचा तृणमूल काँग्रेसचा दावा आहे.

सुदैवाने या हल्ल्यात ममता बॅनर्जी यांना कोणतीही इजा झाली नाही. घटनास्थळी असलेल्या कार्यकर्त्यांनी त्या महिलेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number