आईने नकार देत विद्यार्थ्याचा टोकाचा निर्णय; केवळ 20 रुपयांमुळे…नागपुरातील घटनेने हळहळ

नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

आईने नकार देत विद्यार्थ्याचा टोकाचा निर्णय; केवळ 20 रुपयांमुळे…नागपुरातील घटनेने हळहळ

नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?
नैतिक हा पथरई येथील नवजीवन विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत होता. त्याचे आई-वडील रोजंदारीवर मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी नैतिक शाळेत जाण्यासाठी तयार झाला. घरातून बाहेर पडताना त्याने आईकडे 20 रुपये मागितले. आईने पैसे कशासाठी हवेत, अशी विचारणा केली असता, नैतिकने कारण सांगितले नाही. त्यामुळे आईने पैसे देण्यास नकार दिला. आईने पैसे न दिल्याने नाराज झालेला नैतिक काहीही न बोलता शाळेच्या दिशेने निघून गेला. मात्र घरातून बाहेर पडलेली त्याची पावले पुन्हा कधीच घराकडे परतणार नाहीत. याच कारणावरून त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज वर्तवला जातोय.

सकाळी त्याने शेतात आपले जीवन संपवल्याचे निदर्शनास आले. कुटुंबीयांनी तातडीने त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी देवलापार पोलीस अधिक तपास करत असून नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

हेही वाचा – नवऱ्याचं धक्कादायक सत्य समोर आलं, तरी संसार वाचवण्याचा प्रयत्न! रात्री आईशी बोलली, पण दुसरा दिवस विवाहितेसाठी ठरला अखेरचा…

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number