नाशिक प्रतिनिधी – संतोष खताळ
नाशिक, मालेगावमधील नांदुरीतून भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव कारची बंदोबस्तावरील पोलिसांच्या गाडीला धडक बसली. या दुर्घटनेत वाहतूक उपनिरीक्षक यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
नेमकं काय घडलं?
सप्तशृंगी गडावरील नांदुरीच्या अभोणा चौफुलीवर काल रात्रीच्या सुमारास हा धक्कादायक अपघात घडला. नवरात्रोत्सवानिमित्त गडावर लाखो भाविक येत असल्याने वाहतूक नियंत्रित करण्यासाठी तिथे बॅरेकेटिंग लावून पोलीस बंदोबस्त तैनात होता. कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांच्या पथकाला एका भरधाव अनियंत्रित सियाज कारने जोरदार धडक दिली.कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांच्या पथकाला एका भरधाव अनियंत्रित सियाज कारने जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला, तर 11 हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी व भाविक गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना रुग्णालयात हलवले. मात्र वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक विजय गायकवाड यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.