रत्नागिरीतील आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल; पोलिसांकडून तपास सुरू

रत्नागिरीमधून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. खेड तालुक्यातील लोटे येथील एमईएस आयुर्वेद महाविद्यालयात एका विद्यार्थिनीने जीवन संपवल्याची घटना घडली आहे.

मृत विद्यार्थिनीचे नाव विद्या काळे असे असून ती मूळची छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी होती. ती या महाविद्यालयात बीएएमएसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. ही घटना समोर येताच महाविद्यालय परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच लोटे पोलीस चौकीच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

हेही वाचा – ऐन नवरात्रोत्सवात काळाचा घाला! पोलिसांच्या गाडीचा भीषण अपघात; PSI यांचा मृत्यू, 11 जण गंभीर

विद्यार्थिनीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, या घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही जीवन संपवण्याची घटना आहे की यामागे इतर काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे

(महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर) –

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number