दुर्गापूजा मंडपाबाहेर पडद्यावर व्हिडीओ पाहणाऱ्या गर्दीत घुसली कार; 3 भाविकांचा मृत्यू, 4 गंभीर जखमी

रात्री उशिरा दुर्गा पूजा मंडपाच्या बाहेर रस्त्याच्या कडेला बसून पडद्यावर व्हिडिओ पाहणाऱ्या भाविकांच्या गर्दीत एक भरधाव कार घुसली. या भीषण अपघातात 3 भाविकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.

दुर्गापूजा मंडपाबाहेर पडद्यावर व्हिडीओ पाहणाऱ्या गर्दीत घुसली कार; 3 भाविकांचा मृत्यू, 4 गंभीर जखमी
Balrampur Durga Puja pandal accident

उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना समोर आली आहे. शनिवारी रात्री उशिरा दुर्गा पूजा मंडपाच्या बाहेर रस्त्याच्या कडेला बसून पडद्यावर व्हिडिओ पाहणाऱ्या भाविकांच्या गर्दीत एक भरधाव कार घुसली. या भीषण अपघातात 3 भाविकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर परिसरात एकच पळापळ आणि गोंधळ उडाला. पोलिसांनी तात्काळ संपूर्ण परिसर सील करून पळून गेलेल्या कार चालकाला ताब्यात घेतले आहे.

अंधारामुळे चालकाचे नियंत्रण सुटले

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, कोतवाली देहात पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चरंगिया बेलहा (चिरगाहियान बेल्हा) गावात हा हृदयद्रावक प्रकार घडला. गावात दुर्गा पूजा महोत्सवानिमित्त पंडाल उभारण्यात आला होता. तिथे रस्त्याच्या कडेला लावलेल्या मोठ्या स्क्रीनवर काही भाविक व्हिडिओ पाहण्यासाठी जमले होते. त्याच वेळी सिद्धार्थनगरच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव कारने या 7 जणांना जोरदार धडक दिली. पोलीस अधीक्षक (एसपी) मार्तंड प्रकाश सिंग आणि शहर पोलीस अधिकारी अभिषेक सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधार असल्यामुळे आणि वाहनाचा वेग अधिक असल्याने हा भीषण अपघात घडला.

उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू; आरोपी ड्रायव्हर अटकेत

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व जखमींना बलरामपूर येथील जिल्हा मेमोरियल रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी मनोज सिंग, गणेश आणि पटेश्वरी या तिघांना मृत घोषित केले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांना अधिक उपचारासाठी बहराइच येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकाला पोलिसांनी नाकेबंदी करून ताब्यात घेतले असून त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जात आहे.

हेही वाचा – ऐन नवरात्रोत्सवात काळाचा घाला! पोलिसांच्या गाडीचा भीषण अपघात; PSI यांचा मृत्यू, 11 जण गंभीर

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून शोक व्यक्त

या भीषण दुर्घटनेवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे शोकाकुल कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केल्या. मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला मृत भाविकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत तातडीने देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच दोषी चालकावर कडक कारवाई करण्याचे आणि जखमींना वैद्यकीय उपचार मोफत पुरवण्याचे आदेश दिले आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number