Saturday, March 07, 2026 06:09:30 AM

Pune MIT College: पुण्यातील महाविद्यालयात फूड फेस्टिवलवरून तणाव; विद्यार्थ्यांनी जाळले बांगलादेशी झेंडे

पुण्यातील MIT महाविद्यालयातील फूड फेस्टिवलदरम्यान काही विद्यार्थ्यांनी बांगलादेशी झेंडे जाळले, भाजप युवा मोर्चाचा सहभाग, पोलिस तपास सुरू, कार्यक्रमात तणाव निर्माण झाला.

pune mit college पुण्यातील महाविद्यालयात फूड फेस्टिवलवरून तणाव विद्यार्थ्यांनी जाळले बांगलादेशी झेंडे



 

पुण्यातील MIT कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या “वर्ल्ड कल्चर फेस्टिवल”दरम्यान तोडफोडीची घटना घडली आहे. कॉलेजमध्ये सुरू असलेल्या फूड फेस्टिवलमध्ये बांगलादेशी विद्यार्थ्यांनी उभारलेल्या काही स्टॉल्सवर झेंड्याचे स्टिकर लावण्यात आल्याने वाद निर्माण झाला. या घटनेनंतर काही विद्यार्थ्यांनी आक्रमक होत तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, MIT कॉलेजमध्ये दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमात भारतासह विविध देशांतील विद्यार्थी सहभागी होतात. यंदाच्या फेस्टिवलमध्ये बांगलादेशी विद्यार्थ्यांनी त्यांच्या फूड स्टॉलवर बांगलादेशच्या झेंड्याचे स्टिकर लावले होते. याच मुद्द्यावरून काही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला.

या प्रकारानंतर भाजप युवा मोर्चाशी संबंधित काही विद्यार्थ्यांनी आंदोलन करत बांगलादेशचे झेंडे असलेले स्टिकर जाळल्याचा आरोप आहे. यावेळी बांगलादेशी विद्यार्थ्यांचे काही फूड स्टॉल तोडण्यात आल्याचीही माहिती आहे. परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, नेमकी तोडफोड कोणी केली आणि त्यामागील कारणे काय होती, याचा शोध पोलीस घेत आहेत. कॉलेज प्रशासनाकडूनही या घटनेबाबत माहिती घेतली जात आहे.

दरम्यान, या घटनेमुळे कॉलेज कॅम्पसमधील सुरक्षितता आणि सांस्कृतिक कार्यक्रमांतील नियमांबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. पुढील काळात अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.


सम्बन्धित सामग्री