गुजरातच्या राजकोटमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आलेली आहे. प्रेमविवाहानंतर 7 वर्षे संसार थाटलेल्या दाम्पत्याच्या आयुष्याला अचानकच भीषण वळण मिळालं आहे. एका घटनेने हसतं-खेळंत कुटुंब उद्ध्वस्त झालं असून, या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये राहत असलेल्या विमलने सात वर्षांपूर्वी शीतल हिच्याशी प्रेमविवाह केला होता. या दोघांच्या लग्नाला शीतलच्या घरच्यांना विरोध होता. त्यामुळे कुटुंबाने तिच्याशी संपूर्ण संबंध तोडले होते. काही दिवसांपूर्वीच विमलने पत्नी शीतलसाठी एक नवी गाडी घेतली होती. मात्र, नव्या गाडीची आरसीसी करण्यासाठी त्याने सासरचा पत्ता वापरला. आरसी बुक हे सासरी गेल्याने शीतलच्या घरच्यांना राग आला आणि पुन्हा जुने वाद उफाळून आले.
आरोपी कमले अर्थात विमलचा मेहुण्याने आरसी बुक देण्याच्या बहाण्याने त्याला फोन करत दुकानाजवळ बोलावून घेतले. दुकानाजवळ येताच त्याच्यावर अवघ्या 23 सेकंदात 13 वेळा चाकून वार केले गेले. या हल्ल्यानंतर आरोपी पसार झाला. गंभीर अवस्थेत असलेल्या विमलला रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासणीनंतर मृत घोषित केले.
पत्नीने केली ही मागणी
घटनेनंतर पत्नी शीतलच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी मुख्य आरोपी कमलेश धंडाल आणि त्याच्या एका साथीदाराला अटक केली आहे. या प्रकरणात पत्नीने भावाला फाशीची मागणी केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर
विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान | Maharashtra Election
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.