Crime News : भयंकर! एकाच खोलीत रक्ताच्या थारोळ्यात 5 मृतदेह; 3 पिस्तूलं आणि 5 गोळ्या, सामूहिक कृत्य की..

हे कुटुंब अत्यंत शांत स्वभावाचे होते आणि त्यांचा कोणाशीही वाद नव्हता, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली आहे. कुटुंबातील पाचही जण एकाच खोलीत मृतावस्थेत सापडले आहेत.

Crime News : भयंकर! एकाच खोलीत रक्ताच्या थारोळ्यात 5 मृतदेह; 3 पिस्तूलं आणि 5 गोळ्या, सामूहिक कृत्य की..

Saharanpur Crime News : उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील कौशिक बिहार वसाहतीत एकाच कुटुंबातील 5 सदस्यांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. सरसावा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेत अशोक राठी, त्यांची पत्नी अजिता, आई विद्यावती आणि कार्तिक व देव या दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे पाचही मृतदेह एकाच खोलीत आढळून आले असून सर्वांच्या शरीरावर गोळी लागल्याच्या खुणा आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून 3 गावठी पिस्तूलं आणि मृतांचे मोबाईल फोन हस्तगत केले असून तपास वेगाने सुरू केला आहे.

घटनेचे भीषण वास्तव आणि पोलीस तपास
वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) आशिष तिवारी आणि DIG अभिषेक सिंह यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली. अशोक राठी यांच्या छातीवर, तर त्यांच्या दोन्ही मुलांच्या कपाळावर अगदी जवळून (Point Blank) गोळी झाडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अशोक हे नकुड तहसीलमध्ये शासकीय नोकरीत कार्यरत होते आणि त्यांचे दोन्ही मुलगे अनुक्रमे इयत्ता 9 वी आणि 10 वी मध्ये शिक्षण घेत होते. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

हेही वाचा – Crime News : निळी पेटी उघडताच पोलिसांनाही घाम फुटला, दुसऱ्या पत्नीच्या साथीने रामसिंगने प्रेयसीचा काटा काढला; नेमकं काय घडलं?

शेजाऱ्यांचा धक्कादायक दावा आणि कौटुंबिक पार्श्वभूमी
अशोक राठी यांचे कुटुंब अत्यंत शांत स्वभावाचे होते आणि त्यांचा कोणाशीही वाद नव्हता, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली आहे. कुटुंबातील पाचही जण एकाच खोलीत मृतावस्थेत सापडल्याने ही सामूहिक हत्या आहे की अशोक यांनी सर्वांना मारून स्वतःवर गोळी झाडली, याबाबत पोलिसांमध्ये संभ्रम आहे. अशोक यांना त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाली होती. एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा असा करुण अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली असून पोलीस सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत.

3 पिस्तुलांमुळे गूढ वाढले
या प्रकरणातील सर्वात मोठे कोडे म्हणजे घटनास्थळी सापडलेली 3 पिस्तूलं. जर ही आत्महत्या असेल, तर एकाच व्यक्तीने तीन शस्त्रे का वापरली असावीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांनी संपूर्ण घर सील केले असून फॉरेन्सिक अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. प्राथमिक माहितीनुसार हा प्रकार आत्महत्येचा वाटत असला, तरी सामूहिक हत्येचा अँगलही नाकारता येत नाही. एकाच वेळी कुटुंबातील तीन पिढ्या संपल्याने सहारनपूरमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

हेही वाचा – Crime News : धक्कादायक! रागाच्या भरात पत्नीने दाताने चावून तोडला पतीच्या जीभेचा लचका, सासर-माहेरच्यांमध्येही हाणामारी, नेमकं झालं काय?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number