Friday, February 13, 2026 12:13:13 AM

Crime News : निळी पेटी उघडताच पोलिसांनाही घाम फुटला, दुसऱ्या पत्नीच्या साथीने रामसिंगने प्रेयसीचा काटा काढला; नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशातील झांसीतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 60 वर्षीय व्यक्तीने त्याच्या 32 वर्षीय लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियसीची हत्या केली आहे. नेमकं प्रकरण काय ते जाणून घ्या...

crime news  निळी पेटी उघडताच पोलिसांनाही घाम फुटला दुसऱ्या पत्नीच्या साथीने रामसिंगने प्रेयसीचा काटा काढला नेमकं काय घडलं

मेरठमधील ब्लू ड्रम घटनेची आठवण करून देणारा एक धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील झांसी जिल्ह्यातून समोर आला आहे. एका 60 वर्षीय व्यक्तीने त्याच्या 32 वर्षीय लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियसीची हत्या केली आहे. विशेष म्हणजे 60 वर्षीय व्यक्ती निवृत्त रेल्वे कर्मचारी असून त्याचे यापुर्वीच दोन लग्न झाले होते. नेमकं प्रकरण काय ते जाणून घ्या...


उत्तर प्रदेशातील झांसी जिल्ह्यातील 60 वर्षीय निवृत्त रेल्वे कर्मचारी राम सिंगने त्याच्या सोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रीतीची निर्घृण हत्या केली आहे. पहिल्या पत्नीसोबत वेगळे झाल्यानंतर गीता नावाची महिला ही निवृत्त रेल्वे कर्मचारी राम सिंगची दुसरी पत्नी होती. त्यानंतर राम सिंग गीतासोबत 10 वर्षचं एकत्र राहू शकला. पुढे त्याच्या आयुष्यात तिसरी महिला प्रीती रायकवार आली. रेल्वेच्या आऊटहाऊसमध्ये राहत असताना त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. तिच्या प्रेमात राम सिंग इतका वेडा झाला होता की, त्याने तिच्यावर लाखो रुपये खर्च केले होते. त्यानंतर दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. अनेक काळ एकत्र राहिल्यानंतर दोघांमध्ये वादविवाद निर्माण होऊ लागले.

हेही वाचा- Septic Tank Rules : 'या बिल्डरांना थेट...'; उच्च न्यायालयाकडून बांधकाम व्यावसायिकांवर कडक कारवाईचे आदेश

राम सिंगला प्रीतीवर ती फसवत असल्याचा संशय येू लागला. याच रागात राम सिंगने प्रीतीची हत्या करण्याचा कट रचला. प्रीतीला मारण्यासाठी राम सिंगने एक खोली भाड्याने घेतली. 8 जानेवारी रोजी संध्याकाळी राम सिंग मद्याधुंद अवस्थेत आला आणि त्याने प्रीतीवर कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केली. धक्कादायक गोष्ट अशी आहे की हत्येनंतर तो तीन दिवस मृतदेहासोबत खोलीतच राहिला. त्याने तिचा मृतदेह तीन दिवस ताडपत्री वापरून घरात लपवून ठेवला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी राम सिंगने त्याची दुसरी पत्नी गीता आणि मुलगा नितीन यांची मदत घेतली. त्याने त्याच्या मुलाला एक मोठी लोखंडी पेटी आणि दीड क्विंटल लाकूड आणण्यास सांगितले आणि त्याने प्रीतीचा मृतदेह पेटवून दिला. मृतदेह राख आणि हाडांच्या ढिगाऱ्यात अडकल्यानंतर, संशय येऊ नये म्हणून राम सिंगने पेटीला निळा रंग दिला. 

हेही वाचा- Samadhan Sarvankar VS BJP : 'भाजपाच्या टोळीमुळेच माझा पराभव' समाधान सरवणकरांचा भाजपवर गंभीर आरोप
यानंतर पोलिसांच्या चौकशीदरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली ती म्हणजे, प्रीतीची हत्या केल्यानंतर राम सिंग मुंडण करून प्रयागराजला शुद्धीकरणासाठी स्नान करण्यासाठी जाण्याच्या तयारीत होता. मात्र प्रीतीला ठेवण्यात आलेल्या बॉक्सची विल्हेवाट लावण्यासाठी बोलावण्यात आलेल्या लोडर ड्रायव्हर जयपालला संशय आला आणि त्याने पोलिसांना बोलावले. त्यानंतर पोलिसांना बॉक्समध्ये हाडांचे अवशेष आणि जळालेल्या कोळशासारख्या गोष्टी आढळल्या. या घटनेनंतर सध्या पोलिसांनी राम सिंग, त्याची दुसरी पत्नी गीता आणि एका मुलाला अटक केली आहे. 


सम्बन्धित सामग्री