तेलंगणामधील मेडक जिल्ह्यातून अतिशय थरकापजनक घटना उघडकीस आली आहे. आई काळी जादू करत असल्याचा संशय घेत पोटच्या लेकाने तिच्या अंगावर डिझेल टाकून पेटवून दिले. या थरकापजनक घटनेत 40 वर्षीय सयम्मा यांचा जागीच मृत्यू झालेला आहे. मुलाच्या अशा कृत्यामुळे मेडक जिल्ह्यातील एलुपेटा गावात मोठी खबळळ उडाली आहे. सध्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून,या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दुर्गेश आणि मृत महिला हे आपल्या कुटुंबासह मेडक जिल्ह्यातील एलुपेटा गावात वास्तव्यास होते. गेल्या काही दिवसांपासून दुर्गेशला आपली आई काळी जादू करते, असा संशय होता. याच संशयातून त्याचा राग वाढत गेला आणि आपल्याच आईच्या अंगावर डिझेल टाकून तिला पेटवून दिले.
या आगीत सयम्मा गंभीररीत्या भाजल्या आणि त्यांचा घटनास्थळीच दु्र्दैवी मृत्यू झाला. शिवाय, आई आणि मुलामध्ये कौटुंबिक वाद झाल्याचेही समोर आले आहे. मात्र, घटनेमागील नेमके कारण काय होते ते अजूनही स्पष्ट झालेले नाही. काळी जादू करण्याच्या संशयातूनच हा प्रकार घडला की कौटुंबिक वादातून हे झाले, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच टेकमल पोसिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधित घटनास्थळी माहिती गोळा करुन पुढील तपास सुरु केला आहे. सध्या पोलिसांनी दु्र्गेश याला ताब्यात घेतले आहे.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.