भयंकर! मित्राच्या पत्नीशी लग्न करण्यासाठी पतीला 2 लाखांची सुपारी देऊन संपवलं; 7 जण अटकेत

या गुन्ह्यासाठी मुख्य आरोपीने दोन अल्पवयीन मुलांना तब्बल 2 लाख रुपयांची 'सुपारी' दिल्याची माहिती समोर आली आहे.

भयंकर! मित्राच्या पत्नीशी लग्न करण्यासाठी पतीला 2 लाखांची सुपारी देऊन संपवलं; 7 जण अटकेत
Sonia Vihar death case

उत्तर-पूर्व दिल्लीतील सोनिया विहार भागात एका 34 वर्षीय व्यक्तीच्या हत्येचे अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मित्राच्या पत्नीशी लग्न करण्याच्या वेडापोटी एका व्यक्तीने पतीच्या हत्येचा भयानक कट रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या गुन्ह्यासाठी मुख्य आरोपीने दोन अल्पवयीन मुलांना तब्बल 2 लाख रुपयांची ‘सुपारी’ दिल्याची माहिती समोर आली आहे. या खळबळजनक प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत दोन अल्पवयीन मुलांसह एकूण 7 जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे व मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

गोळ्या झाडून संपवलं

पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, 13 ऑक्टोबर रोजी सोनिया विहारमधील ‘4.5 पुश्ता’ परिसरात मनीष यादव (वय 34) याच्यावर जवळून गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गंभीर जखमी झालेल्या मनीषला तात्काळ सुश्रुत ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले, जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुरुवातीला एका संशयिताने पोलिसांनी दिशाभूल करण्यासाठी दोन अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याची बनावट कहाणी सांगितली होती. मात्र, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि कसून चौकशीचा बडगा उगारल्यानंतर या संपूर्ण कटाचा पर्दाफाश झाला.

UPI द्वारे पैसे पाठवून घराबाहेर बोलावले

तपासातून समोर आले की, मुख्य आरोपी उमेश मौर्य याचे मनीषच्या पत्नीशी लग्न करण्याचे स्वप्न होते. यासाठी त्याने मनीषला संपवण्याचा कट रचला आणि त्यासाठी दोन अल्पवयीन मुलांना 2 लाख रुपयांचे आमिष दाखवले. 10 ऑक्टोबर रोजीही हत्येचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला होता. अखेरीस 13 ऑक्टोबर रोजी मौर्यने अत्यंत चलाखabiने मनीषला घराबाहेर काढण्यासाठी त्याच्या UPI खात्यावर 100 रुपये पाठवले आणि उर्वरित पैसे रोख घेण्यास सांगून त्याला भेटण्यासाठी बोलावले. मनीष घराबाहेर येताच दबा धरून बसलेल्या दोन अल्पवयीन मुलांनी त्याच्या कपाळावर अगदी जवळून गोळी झाडली. यानंतर नाटक म्हणून मौर्यनेच जखमी मनीषला उपचारासाठी नेण्यास मदत केली.

हेही वाचा –  देवीची आरती करून घरी परतत होती, नराधमाने अंधारात ओढलं; 16 वर्षीय मुलीवर भररस्त्यात सपासप वार

शस्त्र आणि मोटारसायकल जप्त

हल्लेखोरांनी गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल यमुना खादर भागात फेकून दिली होती, तर हत्येसाठी वापरलेले पिस्तूल भीम सिंग नावाच्या व्यक्तीने पुरवले होते. पोलिसांनी या प्रकरणी उमेश मौर्य, विवेक सिंग, आनंद, नितीन (उर्फ नरेंद्र) आणि भीम सिंग यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून एक सेमी-ऑटोमॅटिक पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि गुन्हा घडवताना वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा आणखी सखोल तपास करत असून न्यायालयाच्या माध्यमातून कायदेशीर कारवाई तीव्र केली आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number