कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथील एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. एकतर्फी प्रेमातून अवघ्या 16 वर्षीय मुलीचा निर्घृण खून करण्यात आलेले असून 37 वर्षीय अरुण लगमावर हत्या केल्याचा आरोप आहे.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी ही जैन मंदिर परिसरात राहत होती. आरोपी अरुण हा मुलीकडे वाईट नजरेने पाहत होता. पण याकडे तिने दुर्लक्ष केले होते. नवरात्र उत्सव असल्याने वैष्णवी मंदिरामध्ये आरतीचे कार्यक्रम सुरू आहेत. नेहमीप्रमाणे ती आरती आटोपून घरी येत असताना रस्त्यावर कोणी नसल्याचा फायदा घेत अंधारामध्ये दबा धरून बसलेल्या संशयित आरोपी अरुण लगमावर याने एडक्याने मुलीचा हिचा गळा कापून हाता पायावर गंभीर वार केले. ती मृत पावल्याची खात्री करून तो पसार झाला होता.
हेही वाचा – सासऱ्यांना रुग्णालयात दाखल केलं अन् जावयाच्या घरी विपरीत घडलं; अख्खं गाव हादरलं
आरोपीला अटक करा, अन्यथा…
ही केस जलद गती न्यायालयात चालवून,आरोपीला गावामध्ये चौकात फाशी द्यावी, आरोपीला तात्काळ अटक करावी जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत मृतदेहवर अंतिम संस्कार करणार नसल्याचा इशारा संतप्त महिला आणि ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला दिला.
संतापलेल्या महिलांनी आरोपीच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून याला परवानगी दिली नाही. पण संतप्त महिलांनी मयत स्वराला न्याय मिळावा यासाठी आज सायंकाळी पाच वाजता कॅण्डल मार्च काढून गावातील प्रमुख मार्गावरून मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिला आहे. या घटनेने प्रचंड संताप निर्माण झाला असून गावामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update