यवतमाळमध्ये भीषण अपघात! एसटी बस आणि दुचाकीच्या धडकेत तिघांचा दुर्दैवी मृत्यू; मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांना समावेश

यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा ते आर्णी मार्गावर सायखेडा नजीकएसटी बस आणि दुचाकीची भीषण धडक होऊन तिघांचा मृत्यू झाला.
yavatmal road accident
yavatmal road accident

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा ते आर्णी मार्गावर सायखेडा नजीकएसटी बस आणि दुचाकीची भीषण धडक होऊन तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांसह एका 15 वर्षीय मुलाचा समावेश आहे. या दुर्दैवी घटनेमुळे रामगाव हरू गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. या अपघातात किशोर रामराव चव्हाण (वय 33), दीपक रामराव चव्हाण (वय 28) आणि पवन लक्ष्मण पवार (वय 15) यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर तिघांनाही दारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले. मृत किशोर आणि दीपक चव्हाण हे सख्खे भाऊ असल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघातातील एसटी बसचा क्रमांक एमएच 40 एन 9983, तर दुचाकीचा क्रमांक एमएच 14 जे 9238 असल्याची माहिती आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कसा घडला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

हेही वाचा : इलेक्ट्रिक कार डिव्हायडरला धडकली, क्षणार्धात उडाला आगीचा भडका; एकाच कुटुंबातील 4 जणांचा होरपळून मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version