पालघर मधील डहाणूतील पारनाका पर्यटन स्थळाजवळ एका अल्पवयीन तरुणाने टोकाचा निर्णय घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. प्रेमप्रकरणातून हताश झाल्याने त्याने 60 फूट उंच झाडावर चढून जीव संपवण्याची धमकी दिली होती. माहिती मिळताच पालघर पोलीस नियंत्रण कक्ष, डहाणू नगर परिषद अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी फोनवरून सुमारे दोन तास समजूत काढल्यानंतर तरुणाला सुरक्षितपणे खाली उतरवण्यात यश आले. त्यानंतर त्याला समुपदेशन करून पालकांच्या ताब्यात देण्यात आले.या घटनेमुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती. हा प्रकार केवळ प्रेयसीवर दबाव टाकण्यासाठी केलेला स्टंट असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.