पालघरमध्ये थरारक घटना! प्रेमप्रकरणातून अल्पवयीन तरुणाचा टोकाचा निर्णय; पोलिसांमुळे वाचला जीव

पालघर जिल्ह्यातील डहाणूमधून एक थरारक बातमी समोर आली आहे.

पालघरमध्ये थरारक घटना! प्रेमप्रकरणातून अल्पवयीन तरुणाचा टोकाचा निर्णय; पोलिसांमुळे वाचला जीव
Minor Youth

पालघर मधील डहाणूतील पारनाका पर्यटन स्थळाजवळ एका अल्पवयीन तरुणाने टोकाचा निर्णय घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. प्रेमप्रकरणातून हताश झाल्याने त्याने 60 फूट उंच झाडावर चढून जीव संपवण्याची धमकी दिली होती. माहिती मिळताच पालघर पोलीस नियंत्रण कक्ष, डहाणू नगर परिषद अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी फोनवरून सुमारे दोन तास समजूत काढल्यानंतर तरुणाला सुरक्षितपणे खाली उतरवण्यात यश आले. त्यानंतर त्याला समुपदेशन करून पालकांच्या ताब्यात देण्यात आले.या घटनेमुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती. हा प्रकार केवळ प्रेयसीवर दबाव टाकण्यासाठी केलेला स्टंट असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा – नागपूरकरांनी कायदा हातात घेतला! संतप्त जमावाच्या मारहाणीत संशयित चोराला बेदम मारहाण; जागीच मृत्यू

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number