टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणी मोठी अपडेट! आरोपी अंधेरी स्थानकावर दुचाकी सोडून पसार; पोलिसांकडून तपासाला वेग

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील जखमी उमेश चव्हाण यांना केईएममध्ये हलवले; गुन्हा दाखल, आरोपी अंधेरी स्थानकावरून पसार.

टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणी मोठी अपडेट! आरोपी अंधेरी स्थानकावर दुचाकी सोडून पसार; पोलिसांकडून तपासाला वेग

मुंबई: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या गोळीबारात छातीवर गोळी लागून गंभीर जखमी झालेले उमेश चव्हाण यांना कूपर रुग्णालयातून पुढील उपचारांसाठी केईएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे.या प्रकरणी जुहू पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास सुरुवात केली आहे. टायगर श्रॉफच्या ड्रायव्हरच्या फिर्यादीवरून हत्येचा प्रयत्न, कट रचणे आणि शस्त्र कायदा अशा BNS कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला जात आहे. घटनास्थळावरील दोन प्रत्यक्षदर्शींचे जबाबही नोंदवले जात असून त्यांनीच जखमी उमेश चव्हाण यांना रुग्णालयात दाखल केले होते.

अंधेरी स्थानकावर दुचाकी सोडून आरोपी पसार
पोलिसांच्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोळीबार केल्यानंतर तिन्ही आरोपींनी अंधेरी रेल्वे स्थानक गाठले. तिथे हल्ल्यात वापरलेली दुचाकी स्थानकाजवळच सोडून ते पळून गेले.पोलिसांनी तातडीने कारवाई करत अंधेरी स्थानक परिसराचा ताबा घेतला असून ती संशयित दुचाकी जप्त केली आहे. प्राथमिक तपासात ही दुचाकी मुंबईचीच असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी नंबरप्लेट आणि चेसिस नंबरच्या आधारे गाडीचा इतिहास तपासण्यास सुरुवात केली असून मालकाचा शोध घेऊन आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे.आरोपी अंधेरी स्थानकावरून कुठे पळाले, याचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

(महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर) –

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

काय घडलं होतं?
विले पार्ले वेस्ट येथे फुटबॉल मैदानातून कारने परतत असताना टायगर श्रॉफवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्यावेळी टायगर श्रॉफ फ्रंट सीटवर ड्रायव्हरच्या शेजारी बसला होता. या हल्ल्यात टायगर थोडक्यात बचावला, मात्र त्याचा ड्रायव्हर आणि ब्लॉगर उमेश चव्हाण जखमी झाले.

महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number