बाहेरचं चटपटीत खाणं लहानांपासून ते मोठ्यापर्यंत बऱ्याचजणांना आवडतं. घरात लहान मुलं असतील, तर आठवड्यातून एक-दोनदा फास्ट फूड आणलं जातचं. मात्र, उत्तर प्रदेशातील 5 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. या कुटुंबाने रात्री नेमकं काय खाल्ल होतं? या घटनेचा उलगडा कसा झाला? जाणून घेऊयात सविस्तर.
जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील रबूपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नगला श्री पदम गावात ही घटना घडलेली आहे. याच परिसरात पती-पत्नी आणि त्याची तीन लहान मुलं वास्तव्यास आहेत. शनिवारी सकाळ होऊन ही घरातून कोणताही आवाज आला नाही किंवा घरातील एकही सदस्य दिसला नाही. म्हणून मृतांच्या शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी घरात सदस्यांना आवाज दिला आणि दरवाजाही ठोठावला. मात्र, आतून कोणताही आवाज आला नाही. त्यानंतर शेजाऱ्यांनी खिडकीतून घरात पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा घरातील पाचही सदस्य बिछान्यावर पडल्याचे दिसून आले.
तीन चिमुकल्यांसह आई-वडिलांचाही मृत्यू
शेजाऱ्यांनी तातडीने घटनेची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी पोहोचल्यानंचर पोलिसांनी तात्काळ दरवाजा तोडत घरात एन्ट्री केली, त्यावेळी सर्वजण बेशुद्ध अवस्थेत आढळून आले असून सर्वांच्या तोंडातून फेस येत होता. पोलिसांनी पती-पत्नीसह त्यांच्या लहान मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर पाचही जणांना मृत घोषित केले. मृतांमध्ये महेश (वय 37), त्यांची पत्नी ललिता (वय35) आणि त्यांची मुले (वय13), दुसरीचं(वय7) ,तिसऱ्याचं(वय3) अशी नावे आहे.
शेजाऱ्यांनी सांगितलं असं काही…
शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या जेवणात नूडल्स खाल्ल्यानंतर ही घटना घडल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळतात वैद्यकीय कर्मचारी, अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी, वरिष्ट पोलीस अधिकारी, स्थानिक पोलीस पथक सर्वजण अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले होते. प्राथमिक तपासात अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शेजाऱ्यांसह मृत व्यक्ती महेश यांच्या आईनेही सांगितले की, या सर्वांनी रात्री नूडल्स खाल्ले होते.
हेही वाचा-नागपूर हादरलं! युट्यूब पाहून मुलीचा गर्भपात करण्याचा प्रयत्न; आरोपीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल
अन्नाचे नमुने तसेच वैद्यकीय तपासणी आणि इतर पुराव्यांच्या आधारे घडलेल्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. सध्या पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात आहे शिवाय या घटनेचा तपास लवकरात लवकर लावण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.
(महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर)
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update