पुन्हा सेना विरुद्ध राष्ट्रवादी वाद पेटला; थोरवेंवर जिल्हा परिषद सदस्याला जीवे मारण्याच्या धमकीचा आरोप, पोलिसांत तक्रार दाखल

आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप संतोष बैलमारे यांनी केला आहे.

पुन्हा सेना विरुद्ध राष्ट्रवादी वाद पेटला; थोरवेंवर जिल्हा परिषद सदस्याला जीवे मारण्याच्या धमकीचा आरोप, पोलिसांत तक्रार दाखल
santosh bailmare mahendra thorve

खालापूर : रायगडच्या खालापूर तालुक्यातील सावरोली येथे सुरू असलेल्या एल अँड टी कंपनीत स्थानिक तरुणांना रोजगार मिळवून देण्याच्या श्रेय वादावरून आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे सदस्य संतोष बैलमारे यांच्यात चांगलीच जुंपली असून आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्याला जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप बैलमारे यांनी केला आहे. त्यामुळे रायगडमध्ये पुन्हा शिंदे शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. आमदार थोरवे यांनी धमकी दिल्यामुळे आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार देखील बैलमारी यांनी खालापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. एकीकडे कर्जत खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेनेत दुमत असल्याने दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत वाद सुरू आहेत. अशातच आता आमदारांनी दिलेल्या धमकीवरून पोलीस कोणत्या प्रकारे शोध घेऊन कारवाई करतील, हे पाहणं महत्त्वाचं राहील. दरम्यान. महेंद्र थोरवे यांनी सर्व आरोपांना फेटाळून लावले असून आपली बाजू मांडली आहे.

महाराष्ट्रातील सर्व बातम्या एका क्लिकवर 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number