नवरात्रीत मेट्रो प्रवाशांना दिलासा; ‘या’ तारखेपासून रात्री साडे बारा वाजेपर्यंत मेट्रो सेवा सुरू

नवरात्रीदरम्यान गरबा खेळून घरी परतणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रो सज्ज आहे. मुंबईतील 4 मेट्रो मार्गिकांवरील सेवा रात्री 12.30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे

नवरात्रीत मेट्रो प्रवाशांना दिलासा; ‘या’ तारखेपासून रात्री साडे बारा वाजेपर्यंत मेट्रो सेवा सुरू

नवरात्रीदरम्यान गरबा खेळून घरी परतणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रो सज्ज आहे. मुंबईतील 4 मेट्रो मार्गिकांवरील सेवा रात्री 12.30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. 16 ते 20 ऑक्टोबरदरम्यान हा निर्णय लागू राहणार असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) देण्यात आली आहे.

कोणत्या मेट्रो मार्गिकांवरील सेवा रात्री 12.30 वाजेपर्यंत सुरू राहणार?

  1. दहिसर ते गुंदवली मेट्रो 7
  2. दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो 2A
  3. काशीगाव ते दहिसर मेट्रो 9 (टप्पा 1)
  4. मंडाले ते चेंबूर मेट्रो 2B (टप्पा 1)

सध्या मेट्रो सेवा दररोज सकाळी 5.50 ते रात्री 11 वाजेपर्यंत सुरू असते. मात्र, नवरात्रीच्या शेवटच्या 5 दिवसांत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सेवेची वेळ वाढविण्यात आली आहे. या कालावधीत दर 15 मिनिटांनी अतिरिक्त मेट्रो फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.

हेही वाचा – SIR वादादरम्यान निवडणूक आयोगात मोठा भूकंप! ज्ञानेश कुमार यांनी घेतला मोठा निर्णय; थेट 20 अधिकाऱ्यांच्या…

त्यानुसार, मेट्रो 2A मार्गिकेवर 10, मेट्रो 7 आणि 9 मार्गिकांवर प्रत्येकी 14, तर मेट्रो 2B मार्गिकेवर 15 अतिरिक्त फेऱ्या चालविण्यात येतील. यामुळे गरबा खेळून उशिरा घरी परतणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळातही या 4 मार्गिकांसह आरे ते कफ परेड मेट्रो 3 आणि वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो 1 मार्गिकांवरील सेवा कालावधीत वाढ करण्यात आली होती.

त्यामुळे भाविकांना उशिरापर्यंत देवीचे दर्शन घेता येणार असून गरब्याचाही आनंद घेता येणार आहे. मेट्रो सेवेच्या वेळेत वाढ केल्यामुळे प्रवाशांना सोयीस्कर प्रवास करता येईल आणि आपल्या इच्छित स्थानकापर्यंत वेळेत पोहोचता येईल.

(महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर) –

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number