तुळजापूर दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; खामगाव-पंढरपूर महामार्गावरील भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू

तुळजापूर दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना बीड जिल्ह्यातून समोर आली आहे.
तुळजापूर दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; खामगाव-पंढरपूर महामार्गावरील भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू

माजलगाव (बीड): तुळजापूर दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना बीड जिल्ह्यातून समोर आली आहे. खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर माजलगाव तालुक्यातील शिंदेवाडी फाटा येथे अविनाश दादा बनसोडे यांच्या पेट्रोल पंपासमोर एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाला.

आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. तुळजापूरला दर्शनासाठी निघालेले माजलगाव शहरातील गजानन नामदास यांच्यासह एकाच कुटुंबातील पाच जणांचा या अपघातात जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. एक जण गंभीर जखमी आहे.

हेही वाचा – रत्नागिरीतील आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल; पोलिसांकडून तपास सुरू

रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे संताप, रास्ता रोको
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, खामगाव-पंढरपूर महामार्गावरील माजलगाव-तेलगाव-धारूर या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे जंप आणि भेगा पडल्या असून याच कारणामुळे या मार्गावर वारंवार जीवघेणे अपघात घडत आहेत.

या अपघाताला जबाबदार असलेल्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.दरम्यान, अपघाताचे नेमके कारण, मृतांची अधिकृत ओळख आणि प्रशासनाची पुढील भूमिका याबाबत अधिकृत माहिती येणे बाकी आहे.

(महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर) –

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version