पाच वर्षांपूर्वी लग्न, एक मुलगाही! पत्नीला प्रियकरासोबत पाहताच पतीनं…; पोलिस येताच प्रकरणाला वेगळंच वळण

Crime News : उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये पत्नीला तिच्या कथित प्रियकरासोबत ऑटोमधून जाताना पाहिल्यानंतर पतीने दोघांना अडवल्याची घटना समोर आली आहे. यानंतर रस्त्यावर गोंधळ उडाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तिघांनाही पोलीस ठाण्यात नेले.
पत्नीला प्रियकरासोबत पाहताच पतीचा संताप अनावर
Husband Catches Wife With Alleged Lover

उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये घडलेल्या एका घटनेने रस्त्यावर मोठा गोंधळ उडाला. राजा का ताल परिसरात लोकांची गर्दी जमली आणि मध्येच जोरजोरात आरडाआरोड सुरु झाली. नक्की काय घडलं ते पाहण्यासाठी आसपासहून लोक धावले तेव्हा समोरचे दृश्य पाहून सगळेच अवाक झाले.

नक्की घडले काय?
एक तरुण एका ऑटोला रस्त्यात अडवून त्यात बसलेल्या महिला आणि तरुणाला जबरदस्ती बाहेर काढत होता आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून मारहाण करणाऱ्या व्यक्तीच पत्नी होती आणि तिच्यासोबत बसलेला तरुण तिचा प्रियकर असल्याचा आरोप त्याने केलेला आहे.

हेही वाचा-ज्या तुरुंगात महिला जेलर म्हणून रुबाब मिरवला, तिथेच कैदी म्हणून रवानगी; नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, हे दाम्पत्य मूळचे फिरोजाबादचे होते. साधारण पाच वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले असून त्यांना एक मुलगा देखील आहे. पती हा गुरुग्राममध्ये मजुरीचे काम करतो. काही काळासाठी तो आपल्या पत्नीलाही गुरुग्रामला घेऊन गेला होता. पोलिसांना दिलेल्या जबाबात पतीने सांगितले की, तिथेच त्याची पत्नी ही राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील रुपवासच्या एका तरुणाच्या संपर्कात आली होती. त्यानंतर पत्नी ही मला सोडून प्रियकरासोबत लिव्ह-इनमध्ये राहायला गेली होती. तेव्हापासून तो तिचा शोध घेत होता. त्यानंतर ती फिरोजाबादमध्ये असल्याची कुणकून त्याला मिळताच तो तिथे आला आणि दोघांना ऑटोमधून एकत्र पाहताच त्याचा राग अनावर झाला.

पोलीस ठाण्यात नाट्यमय वळण
संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि तिघांनाही पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मात्र, ठाण्यात या प्रकाराला वेगळाच ट्विस्ट आला. पत्नीने पतीसोबत जाण्यास ठाम नकार दिला. उलट पती दारु पिऊन रोज मारहाण करतो, दारुसाठी घरातील सामान आणि दुचारी विकली, असा गंभीर आरोप महिलेने पतीवर केला आहे. त्यामुळे आपण त्याला कायमचे सोडले असे तिने सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version