सकाळी ढगाळ वातावरण, दुपारी उन्हाचा चटका! राज्यात ऑक्टोबर हिटचा प्रभाव, पुढील 2 दिवस IMD चा अंदाज काय?

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू असताना राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. राज्यात पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका वाढला असून, 'ऑक्टोबर हीट चांगलीच तापदायक ठरत आहे.

सकाळी ढगाळ वातावरण, दुपारी उन्हाचा चटका! राज्यात ऑक्टोबर हिटचा प्रभाव, पुढील 2 दिवस IMD चा अंदाज काय?
Weather Update

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू असताना राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. राज्यात पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका वाढला असून, ‘ऑक्टोबर हीट चांगलीच तापदायक ठरत आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान 35 अंशांच्या पुढे गेलं असून नागरिकांना ‘ऑक्टोबर हीट’चा त्रास जाणवत आहे. दरम्यान आज 9 ऑक्टोबर रोजी राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे. यावेळी कोकणात उष्ण व दमट हवामानाचा येलो अलर्ट देण्यात आला असून नागरिकांना दुपारच्या वेळेस घराबाहेर न पडण्याचा आणि सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

मुंबईसह कोकणात तापमानाचा पारा सातत्याने 35 अंशांच्या वर असून उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. संपूर्ण राज्यातून मोसमी पावसाने माघार घेतल्याची घोषणा हवामान विभागाने गुरुवारी केली. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून आता उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरात मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा कायम असून गुरुवारीही मुंबईत सरासरीहून अधिक कमाल तापमानाची नोंद झाली असून हवामान विभागाने शुक्रवारी उष्णेच्या लाटेसदृश्य स्थितीचा अंदाज वर्तवला आहे.

हेही वाचा- पालघरमध्ये खळबळ! भूकंपाच्या धक्क्यांनी नागरिकांचा थरकाप; इतक्या रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद

आज संपूर्ण कोकण विभागात आज उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागात उष्णेतच्या लाटेसदृश्य स्थिती राहील.ठाणे, रायगड आणि रत्नागिरीमध्ये रविवारपर्यंत उष्ण आणि दमट वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. असताना, राज्याच्या बहुतांश भागात तापमानाचा पारा वाढला आहे. तर दुसरीकडे मध्य महाराष्ट्रात धुळे, जळगाव, सोलापूर येथे उच्चांकी 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तरी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.

तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्यात 38 अंश से‌ल्सिअस अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. तसेच विदर्भात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम 37 अंश से‌ल्सिअस अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number