वाद मिटवण्यासाठी बोलावलं, पण रक्तरंजित शेवट! वर्ध्यात 21 वर्षीय अभिजीतवर धारदार शस्त्राने हल्ला

वर्ध्याच्या आर्वीत 21 वर्षीय अभिजीत ढोकणे याच्यावर चाकू आणि रॉडने हल्ला करण्यात आला.

वाद मिटवण्यासाठी बोलावलं, पण रक्तरंजित शेवट! वर्ध्यात 21 वर्षीय अभिजीतवर धारदार शस्त्राने हल्ला
Wardha News

प्रमोद पानबुडे, प्रतिनिधी, वर्धा : वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरात 21 वर्षीय तरुणाची चाकू आणि लोखंडी रॉडने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अभिजीत ढोकणे असे मृत तरुणाचे नाव आहे. गुरुवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

वाद मिटवण्याच्या बहाण्याने बोलावल्याचा आरोप

प्राथमिक माहितीनुसार, अभिजीत ढोकणे याला फोन करून वाद मिटवण्याच्या उद्देशाने बोलावण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या भेटीदरम्यान त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. चाकू आणि लोखंडी रॉडने त्याच्यावर वार करण्यात आले. या हल्ल्यात अभिजीत गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला.

मानेवर, गळ्यावर आणि चेहऱ्यावर वार

हल्लेखोरांनी अभिजीतच्या मानेवर, गळ्यावर आणि चेहऱ्यावर सपासप वार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेचे वृत्त समोर येताच आर्वी शहरात एकच खळबळ उडाली. तरुणाच्या हत्येमागील नेमके कारण काय, याबाबत अद्याप अधिकृत माहिती स्पष्ट झालेली नाही.

आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात दाखल?

या प्रकरणात विशाल निपाने याचे नाव आरोपी म्हणून समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, त्याने स्वतः पोलीस ठाणे गाठल्याची माहिती मिळत आहे. मात्र, या प्रकरणातील त्याची नेमकी भूमिका आणि हत्येमागील कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, पोलिसांकडून घटनेची चौकशी सुरू असून, अभिजीतला कोणत्या कारणासाठी बोलावण्यात आले होते आणि हल्ल्यामागे नेमके कोणते कारण होते, याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणातील पुढील तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number