Monday, November 17, 2025 06:10:15 AM

Triple Talaq Via WhatsApp: हुंड्यासाठी वर्षानुवर्षे पत्नीचा छळ! बायकोने घर सोडल्यानंतर पतीने व्हॉट्सअॅपवर दिला तिहेरी तलाक

बसेरा गावातील रहिवासी हसन याने आपल्या पत्नीला व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे तिहेरी तलाक दिल्याचा आरोप असून, पोलिसांनी त्याच्यासह कुटुंबातील सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

triple talaq via whatsapp हुंड्यासाठी वर्षानुवर्षे पत्नीचा छळ बायकोने घर सोडल्यानंतर पतीने व्हॉट्सअॅपवर दिला तिहेरी तलाक

Triple Talaq Via WhatsApp: उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात तिहेरी तलाकाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बसेरा गावातील रहिवासी हसन याने आपल्या पत्नीला व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे तिहेरी तलाक दिल्याचा आरोप असून, पोलिसांनी त्याच्यासह कुटुंबातील सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सर्कल ऑफिसर रविशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आस्माने रविवारी आपल्या पती हसन, सासू रशिदा आणि दोन दीर सलीम व शाकीर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

हुंड्यासाठी सतत छळ

तक्रारीत आस्माने नमूद केले की, तिचा विवाह नोव्हेंबर 2017 मध्ये हसनशी झाला. लग्नानंतरपासूनच तिला हुंड्यासाठी सतत छळ सहन करावा लागला, त्यामुळे ती काही वर्षांपूर्वी पतीचे घर सोडून पालकांसोबत राहू लागली. 31 मार्च 2025 रोजी हसनने तिला व्हॉट्सअॅपवर तिहेरी तलाकचा मेसेज पाठवला, जो कायद्याने पूर्णपणे बेकायदेशीर आहे. या प्रकरणात हुंडा प्रतिबंधक कायदा आणि मुस्लिम महिला (विवाह हक्कांचे संरक्षण) कायदा, 2019 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचा - Ahilyanagar Violent Clash: अहिल्यानगरमध्ये 'आय लव्ह मोहम्मद' रांगोळीवरून हिंसक संघर्ष; 30 जणांना अटक

यापूर्वी गोरखपूरमध्ये आत्महत्या

याच महिन्याच्या सुरुवातीला गोरखपूरमध्येही अशीच घटना घडली होती. हुंड्याच्या छळाला कंटाळून एका महिलेने आत्महत्या केली होती. तिच्या पतीने फोनवरून तिहेरी तलाक दिल्यानंतर तिने गळफास घेऊन जीवन संपवल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात चौकशी सुरू असून, दुर्लक्ष केल्याबद्दल एका उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.

हेही वाचा - Nepal Gen Z Protests : नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनाचा थरार! चौदा हजाराहून जास्त कैदी तुरुंगातून फरार, काही स्वतःहून आले माघारी

तिहेरी तलाक  

दरम्यान, 2019 मध्ये पारित झालेल्या मुस्लिम महिला (विवाह हक्कांचे संरक्षण) कायद्यानुसार, तोंडी, लेखी किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दिलेला तिहेरी तलाक गुन्हा मानला जातो. या कायद्यानुसार, दोषी ठरल्यास तीन वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. महिलांना मनमानी घटस्फोटापासून संरक्षण मिळावे यासाठी हा कायदा लागू करण्यात आला आहे.
 


सम्बन्धित सामग्री