Friday, November 07, 2025 09:32:27 AM

Diwali 2025: दिवाळीत ‘या’ वस्तू नक्की खरेदी करा; लाभेल सुख, समृद्धी आणि लक्ष्मी मातेचा खास आशीर्वाद

यावर्षी दिवाळी कार्तिक अमावास्येच्या दिवशी, म्हणजेच 20 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे.

diwali 2025 दिवाळीत ‘या’ वस्तू नक्की खरेदी करा लाभेल सुख समृद्धी आणि लक्ष्मी मातेचा खास आशीर्वाद

Diwali 2025: यावर्षी दिवाळी कार्तिक अमावास्येच्या दिवशी, म्हणजेच 20 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात दिवाळीला विशेष महत्व आहे. धार्मिक मान्यता आहे की या दिवशी देवी लक्ष्मी आणि गणपतीची  पूजा केल्यास जीवनात सुख-शांती, समृद्धी आणि आर्थिक वाढ होते. दिवाळी ही तेजाचा आणि आनंदाचा उत्सव आहे, आणि प्रत्येक कुटुंब या दिवशी घरात भरपूर आनंद आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी सजावटीपासून ते पूजा-पाठापर्यंत सर्व तयारी करते.

दिवाळीच्या दिवशी काही वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी घरात काही खास वस्तू आणल्यास लक्ष्मी देवीचे घरात आगमन होते आणि घरात धन-वैभव वाढते.

1. झाडू: घरात स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जा
धार्मिक मान्यतेनुसार झाडू हे धनदेवी माता लक्ष्मीशी संबंधित आहे. स्वच्छ आणि नीटनेटके घरातच लक्ष्मी वास करते. झाडू खरेदी करून घरात ठेवणे या दिवशी अत्यंत शुभ मानले जाते. झाडूच्या माध्यमातून नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घरात सुख-शांती कायम राहते.

हेही वाचा: Diwali Flight Ticket Fare : दिवाळीत विमानप्रवास होणार स्वस्त ; DGCA चे निर्देश

2. लक्ष्मी-गणेश मूर्ती: घरात शुभता आणि समृद्धी
दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती घरात आणून पूजा करणे अत्यंत शुभ असते. या दिवशी पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि सुख-समृद्धी वाढते. लक्ष्मी-गणेश मूर्ती घरात ठेवल्यास देवीची कृपा सदैव राहते.

3. दिवा: नकारात्मकतेचा नाश आणि शुभता 
दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव असल्यामुळे घरात दिवा अथवा पणत्या लावणे अनिवार्य आहे. दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा घरात वाढते. धार्मिक मान्यता आहे की दिवा लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरातील सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. 

4. नारळ: आर्थिक स्थिरता आणि संपत्ती
दिवाळीच्या दिवशी घरात नारळ आणणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे आर्थिक तंगी दूर होते आणि तिजोरी कधीही रिकामी राहत नाही. नारळ घरात आणणे हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते.

हेही वाचा: Diwali Festival 2025 : यंदा दिवाळी कधी साजरी होणार?; 20 की 21 ऑक्टोबरला, जाणून घ्या

या सर्व वस्तू खरेदी करून आणि घरात योग्य पद्धतीने ठेवून आपण दिवाळी अधिक सुखमय आणि समृद्ध करू शकतो.देवी लक्ष्मीची कृपा आणि सकारात्मक ऊर्जा घरात निर्माण होईल, तसेच कुटुंबातील सर्व सदस्य सुख-समृद्धीत राहतील.

दिवाळी हा फक्त रोषणाईचा उत्सव नाही, तर सुख-समृद्धी, आनंद आणि सकारात्मक ऊर्जा यांचा उत्सव देखील आहे. या दिवशी योग्य वस्तू घरात आणल्यास त्याचा प्रभाव संपूर्ण वर्षभर टिकतो आणि घरच्यांचे नशीब उजळून निघते.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)

 


सम्बन्धित सामग्री