‘आमने-सामने’ वादावर लीना भागवत आणि मंगेश कदम यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, ‘नाण्याची दुसरी बाजू’

मराठी रंगभूमीवर व्यावसायिक नाटकांची चलती असतानाच 'आमने-सामने' या गाजलेल्या नाटकावरून वाद निर्माण झाला आहे. या नाटकाचा नुकताच कॅनडा दौरा पार पडला. या दौऱ्यानंतर या नाटकातील कलाकार रोहन गुजर आणि केतकी पालव यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत निर्मात्यांवर नाराजी व्यक्त केली होती. मानधनवाढीची मागणी केल्याने निर्मात्यांनी आपल्याला तडकाफडकी नाटकातून काढून टाकल्याचा आरोप त्यांनी केला होता.
‘आमने-सामने’ वादावर लीना भागवत आणि मंगेश कदम यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, ‘नाण्याची दुसरी बाजू’

मराठी रंगभूमीवर व्यावसायिक नाटकांची चलती असतानाच ‘आमने-सामने’ या गाजलेल्या नाटकावरून वाद निर्माण झाला आहे. या नाटकाचा नुकताच कॅनडा दौरा पार पडला. या दौऱ्यानंतर या नाटकातील कलाकार रोहन गुजर आणि केतकी पालव यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत निर्मात्यांवर नाराजी व्यक्त केली होती. मानधनवाढीची मागणी केल्याने निर्मात्यांनी आपल्याला तडकाफडकी नाटकातून काढून टाकल्याचा आरोप त्यांनी केला होता.

लीना भागवत यांचे ‘नाण्याची दुसरी बाजू’

या आरोपांनंतर आता नाटकाचे निर्माते आणि अभिनेते लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी आपली बाजू मांडली आहे. लीना भागवत यांनी ‘नाण्याची दुसरी बाजू’ असे कॅप्शन देत एक व्हिडिओ शेअर केला आहे.या व्हिडिओत लीना भागवत म्हणाल्या, “आमने-सामने या नाटकात मी काम करते आणि आम्ही दोघेही या नाटकाचे निर्माते आहोत. आमच्या आधीच्या सहकलाकारांनी काल जो व्हिडिओ पोस्ट केला, तो आम्ही पाहिला. दिवसभर त्यावर आलेल्या प्रतिक्रियाही पाहिल्या. त्यानंतर आम्हाला आमची बाजू मांडावीशी वाटते.

मानधन वाढवून मागितले म्हणून तडकाफडकी काढून टाकले, असा सूर त्या व्हिडिओत दिसतो. पण या सगळ्यात एक शब्द राहून गेला आणि तो म्हणजे ‘तिसऱ्यांदा’ मानधन वाढवून मागितले.””दरवर्षी मानधनवाढ शक्य नाही””सुरुवातीला जेव्हा त्यांनी मानधनवाढीचा प्रस्ताव मांडला, तेव्हा तो अगदी मामुली होता. कारण नाटक तेव्हा सुरूही झाले नव्हते. इतक्या वर्षांनंतर ती वाढ गरजेचीच होती, त्यामुळे आम्ही होकार दिला. मात्र, नाटक चांगले चालू लागल्यावर 4 ते 5 महिन्यातच पुन्हा दुसऱ्यांदा मानधनवाढीचा प्रस्ताव आला,” असे लीना यांनी सांगितले.

यावर मंगेश कदम म्हणाले, “दुसऱ्यांदा प्रस्ताव आला तेव्हा मीच त्यांच्याशी बोललो. मी त्यांना अपेक्षा विचारल्या आणि त्यांनी सांगितलेल्या अपेक्षा आम्ही लगेच मान्य केल्या. याचे सर्व मेसेज लिखित स्वरूपात आमच्याकडे आहेत.” लीना पुढे म्हणाल्या, “मानधनवाढीनंतर प्रयोग सुरळीत सुरू झाले, पण वर्ष पूर्ण होण्याआधीच कॅनडा दौऱ्यादरम्यान तिसऱ्यांदा मानधनवाढीचा प्रस्ताव आला.” यावर मंगेश कदम म्हणाले, “मला धक्काच बसला. कारण दुसऱ्यांदा मानधन वाढवले तेव्हा मी त्यांना विचारले होते की, आणखी काही अपेक्षा आहेत का? तेव्हा दोघांनीही सांगितले होते की, जे वाढवले आहे ते पुरेसे आहे.”

हेही वाचा – ‘शेवटचं गुडबायही करता आलं नाही’, रोहन गुजर आणि केतकी पालव यांचा खळबळजनक दावा; म्हणाले, ‘आमने सामने’ नाटकाच्या टीममधून असं बाहेर काढलं की..

शेवटी लीना भागवत यांनी स्पष्ट केले, “त्या तिसऱ्या प्रस्तावासोबत आम्हाला सांगण्यात आले की, दरवर्षी अशी मानधनवाढ अपेक्षित आहे. मराठी रंगभूमीवर कोणत्याही निर्मात्याला दरवर्षी अशी मानधनवाढ करणे शक्य होईल की नाही, माहीत नाही. पण आम्हाला ते शक्य नव्हते, म्हणून आम्ही नकार दिला. ज्या मोबदल्याची त्यांना अपेक्षा आहे, तो आम्ही देऊ शकत नसल्याने त्यांच्याकडून काम करवून घेणे योग्य नाही, असे आम्हाला वाटले. म्हणून आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला. यापुढे या विषयावर आमच्याकडून कोणताही व्हिडिओ किंवा पोस्ट केली जाणार नाही.”दरम्यान, लीना आणि मंगेश यांच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांसह मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर-

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version