Bigg Boss Fame Suraj Chavan : सूरज चव्हाणच्या होणाऱ्या पत्नीचा चेहरा अखेर समोर आलाच!; ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिताने थाटात केलं केळवण

मराठी बिग बॉस फेम सूरज चव्हाण आणि त्याची होणारी पत्नी चर्चेत आलेत. नुकतंच 'कोकण हार्टेड गर्ल' नावाने प्रसिद्ध असलेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता प्रभू वालावलकर हिने त्यांचं केळवण केलंय.

Bigg Boss Fame Suraj Chavan : सूरज चव्हाणच्या होणाऱ्या पत्नीचा चेहरा अखेर समोर आलाच!; ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिताने थाटात केलं केळवण

Bigg Boss Marathi Winner Suraj Chavan would be Wife : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता आणि प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाण सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने लग्न ठरल्याचे जाहीर करत होणाऱ्या पत्नीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र, त्याने तिचा चेहरा आणि नाव गुलदस्त्यात ठेवल्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. आता अखेर चाहत्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे, कारण सूरज चव्हाणच्या होणाऱ्या पत्नीचा चेहरा समोर आला आहे!

अंकितामुळे समोर आले नाव आणि चेहरा
सूरज चव्हाण आणि त्याची पत्नी चर्चेत येण्याचे कारण ठरले आहे ते म्हणजे ‘कोकण हार्टेड गर्ल’ नावाने प्रसिद्ध असलेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता प्रभू वालावलकर. अंकिताच्या घरी नुकतेच सूरज चव्हाणचे केळवण (विवाहापूर्वी वधू-वरांना दिले जाणारे स्नेहभोजन) पार पडले. यावेळी सूरजसोबत त्याची होणारी पत्नीही उपस्थित होती, जिचे नाव संजना आहे. अंकितानेच संजनाचा चेहरा आणि नाव जाहीर केले असून, या केळवणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – Salman Khan Court Notice: सलमान खान अडचणीत, जाहिरात करणं नडलं ; न्यायालयाने बजावली नोटीस

उखाण्यातून पत्नीच्या नावाचा खुलासा
अंकिताने आपल्या घरी पारंपारिक पद्धतीने औक्षण (Oukshan) करून आणि छान सजावट करून सूरज आणि संजनाचे केळवण थाटात केले. अंकिताने दोघांसाठी प्रेमाने अनेक पदार्थ बनवले होते आणि जेवण सुरू करण्यापूर्वी सूरजने उखाणा घेऊन पत्नीचे नाव जाहीर केले.

सूरजचा खास उखाणा: “बिग बॉस जिंकून झालं माझं स्वप्न पूर्ण… संजनाचं नाव घेतो, बोललो होतो ना आधी करिअर मग लग्न” असा छानसा मॉडर्न युगाला साजेसा उखाणा सूरजने घेतला.
संजनाचा मजेशीर उखाणा: त्यानंतर संजनानेही मजेशीर उखाणा घेतला, “बिग बॉसचा विनर झाला माझ्या प्रेमात सायको, सूरज रावांचं नाव घेते मीच त्यांची होणारी बायको.”

सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
अंकिताने सूरज आणि संजनाला अनेक भेटवस्तू दिल्या. तिने या केळवणाचे खास फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. “सुरज आणि संजना.. सूरजचं केळवण!” अशी खास कॅप्शनही तिने या पोस्टला दिली आहे. या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत, सूरजचे अभिनंदन केले आहे. सूरजच्या लग्नाची तारीख अद्याप जाहीर झाली नसल्याने अनेकांनी त्याबद्दल प्रश्न विचारले आहेत, तर काही चाहत्यांनी अभिनंदन करत ‘होणारी वहिनी छान आहे’ असे म्हणत संजनाचे कौतुक केले आहे. केळवणाच्या वेळी सूरज पिवळ्या रंगाच्या हुडी आणि क्रीम कलरच्या पँटमध्ये, तर संजना काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूप सुरेख दिसत होती.

हेही वाचा – Multiplex Overcharging Rates: 50 रुपयांचे कोल्डड्रिंक 400 रुपयांना देता? मल्टिप्लेक्समधील मनमानी दरांवर सर्वोच्च न्यायालयाने ओढले ताशेरे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number