Thursday, July 17, 2025 02:06:19 AM

विजय देवराकोंडाच्या अडचणी वाढल्या; आदिवासी समुदायावर भाष्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

आदिवासी समुदायाच्या भावना दुखावणारी टिप्पणी केल्याबद्दल विजय देवरकोंडा यांच्याविरुद्ध एससी/एसटी कायद्यांतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

विजय देवराकोंडाच्या अडचणी वाढल्या आदिवासी समुदायावर भाष्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
Vijay Deverakonda
Edited Image

FIR Against Vijay Deverakonda: दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा नेहमीच चर्चेत असतो. रश्मिका मंदान्नासोबतच्या जवळीकतेमुळे माध्यमांमध्ये त्यांच्या सतत बातम्या असतात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून विजय देवरकोंडा त्यांच्या एका विधानामुळे चर्चेत आहेत, ज्यामुळे तो नव्या वादात अडकला आहे. आदिवासी समुदायाच्या भावना दुखावणारी टिप्पणी केल्याबद्दल विजय देवरकोंडा यांच्याविरुद्ध एससी/एसटी कायद्यांतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

विजय देवरकोंडाविरोधात गुन्हा दाखल - 

दरम्यान, जॉइंट अ‍ॅक्शन कमिटी ऑफ ट्रायबल कमिटीचे राज्याध्यक्ष नेनावथ अशोक कुमार नाईक यांनी दाखल केलेल्या तक्रारीत दावा करण्यात आला आहे की 'रेट्रो' चित्रपटाच्या रिलीजपूर्व कार्यक्रमादरम्यान विजय देवरकोंडाने आदिवासी समुदायावर आक्षेपार्ह आणि अपमानास्पद टिप्पणी केली होती. या प्रकरणी सायबराबादमधील रायदुर्गम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा - 'या' कारणामुळे शाहरुख खानच्या 'मन्नत'साठी सरकार देणार 9 कोटी रुपये

विजय देवरकोंडा 26 एप्रिल रोजी हैदराबादमध्ये 'रेट्रो' चित्रपटाच्या रिलीजपूर्व एका कार्यक्रमासाठी आला होता. जिथे त्याने आदिवासी समुदायावर टिप्पणी केली होती. या प्रकरणी अभिनेत्याविरुद्ध आधीच तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात, आदिवासी वकील संघटनेचे बापूनगरचे अध्यक्ष किशनराज चौहान यांनी कार्यक्रमात अभिनेत्यावर आदिवासींबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप करणारी लेखी तक्रार दाखल केली होती.

हेही वाचा - सुनीताने नावातून काढून टाकले गोविंदाचे आडनाव; घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा उधाण

अभिनेत्याने मागितली माफी - 

तथापी, विजय देवरकोंडाने या प्रकरणी आधीच माफी मागितली आहे. त्याने एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये त्याने लिहिले होते की, 'रेट्रो ऑडिओ लाँच कार्यक्रमादरम्यान मी केलेल्या एका टिप्पणीमुळे काही सदस्यांमध्ये वाद आणि चिंता निर्माण झाली आहे. मी प्रामाणिकपणे स्पष्ट करू इच्छितो की कोणत्याही समुदायाला, विशेषतः अनुसूचित जमातींना, ज्यांना मी मनापासून आदर करतो आणि आपल्या देशाचा अविभाज्य भाग मानतो, त्यांच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता.'
 


सम्बन्धित सामग्री