Sonakshi Sinha Pregnant : बॉलिवूडमध्ये सध्या दिवाळी पार्ट्यांची धूम सुरू झाली आहे. मनीष मल्होत्रापाठोपाठ रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. हृतिक रोशन, सबा आझाद यांच्यासह अनेक स्टार्सनी या सेलिब्रेशनला हजेरी लावली, पण या सगळ्यामध्ये चर्चा झाली ती अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचा पती झहीर इक्बाल यांची.
या पार्टीसाठी सोनेरी आणि ऑफ-व्हाइट रंगाच्या सुंदर पोशाखात सोनाक्षी दिसली. तिचा हा लूक पाहून अनेक नेटकऱ्यांनी ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू केल्या. तिच्या व्हिडिओवर आधारित या अफवा सुरू असतानाच, झहीरने पापाराझींसमोर असे काही केले की सगळे चकित झाले. खुद्द सोनाक्षीही काही क्षणांसाठी गोंधळात पडली. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
झहीरने केले बेबी बंप लपवण्याचे नाटक:
सोनाक्षी प्रेग्नंट असल्याच्या अफवांना झहीरने विनोदी पद्धतीने उत्तर दिले. रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीला हे दोघे पोहोचले असताना, झहीरने कॅमेऱ्यासमोर अचानक सोनाक्षीच्या पोटाला स्पर्श केला आणि तिचा बेबी बंप लपवण्याचा अभिनय केला. हे पाहून सोनाक्षीने आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहिले, तेव्हा दोघेही हसले. झहीरने पुन्हा एकदा हा प्रयत्न केला तेव्हा सोनाक्षीने त्याला प्रेमाने थांबवले. अखेरीस, झहीर हसत म्हणाला की या सर्व केवळ अफवा आहेत.
हेही वाचा - Dancer Actress Madhumati Passes Away: बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री आणि नृत्यांगणा मधुमती यांचे 87 व्या वर्षी निधन; सेलिब्रिटींकडून शोक व्यक्त
नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया:
या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या मजेदार कमेंट्सचा पाऊस पडत आहे. 'झहीर खूप मजेशीर आहे,' असे एका युजरने लिहिले आहे. तर, दुसऱ्या एका व्यक्तीने 'या दोघांनी सर्व अफवांना पूर्णविराम दिला,' अशी प्रतिक्रिया दिली. आणखी एका चाहत्याने 'ते खूप गोंडस आणि मजेदार आहेत. त्यांची जोडी परिपूर्ण आहे,' असे म्हटले आहे.
सोनाक्षी आणि झहीर यांचे लग्न:
सोनाक्षी आणि झहीर यांनी 23 जून 2024 रोजी मुंबईतील बास्टियन येथे कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. त्यानंतर त्यांनी एक भव्य रिसेप्शन आयोजित केले होते. लग्न झाल्यापासून, हे जोडपे सोशल मीडियावर त्यांच्या नात्यातील आनंदी आणि भावनिक क्षण नेहमी शेअर करत असतात.
सोनाक्षीचे आगामी काम:
कामाबद्दल बोलायचे झाल्यास, सोनाक्षी सिन्हा शेवटची “निकिता रॉय” या चित्रपटात दिसली होती. सध्या ती “दा-बँग: द टूर रीलोडेड टू कतार” या भव्य बॉलिवूड कॉन्सर्टची तयारी करत आहे. संगीत, नृत्य आणि स्टार परफॉर्मन्स असलेला हा शो 14 नोव्हेंबर 2025 रोजी दोहा येथील एशियन टाउन अॅम्फीथिएटर येथे आयोजित केला जाणार आहे.
हेही वाचा - Rajat Bedi Daughter : रजत बेदीच्या मुलीचा सोशल मीडियावर जलवा! पण लोकप्रियतेमुळे वाढली चिंता