आता मराठीत पाहा ‘क्राईम पेट्रोल’! उपेंद्र लिमये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत; जाणून घ्या वेळ

मराठी कलाकार आता चित्रपटांसोबतच लोकप्रिय दूरचित्रवाणी कार्यक्रमांमध्येही आपली छाप पाडत आहेत. माधुरी दीक्षित यांच्यानंतर आता ज्येष्ठ अभिनेते उपेंद्र लिमये छोट्या पडद्यावर एका नव्या भूमिकेत दिसत आहेत.
आता मराठीत पाहा ‘क्राईम पेट्रोल’! उपेंद्र लिमये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत; जाणून घ्या वेळ

मराठी कलाकार आता चित्रपटांसोबतच लोकप्रिय दूरचित्रवाणी कार्यक्रमांमध्येही आपली छाप पाडत आहेत. माधुरी दीक्षित यांच्यानंतर आता ज्येष्ठ अभिनेते उपेंद्र लिमये छोट्या पडद्यावर एका नव्या भूमिकेत दिसत आहेत. ते ‘क्राईम पेट्रोल मराठी’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहेत. त्यामुळे मराठी प्रेक्षकांमध्ये या कार्यक्रमाबाबत उत्सुकता आहे.

‘सोनी मराठी’ने सोशल मीडिया पेजवर या कार्यक्रमाचा प्रोमो शेअर करत त्याची घोषणा केली होती. लोकप्रिय हिंदी कार्यक्रम ‘क्राईम पेट्रोल’ आता मराठी भाषेतही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या मराठी आवृत्तीची सूत्रसंचालनाची धुरा उपेंद्र लिमये सांभाळत आहेत.

प्रोमो शेअर करताना वाहिनीने, “पुरावे मिटवता येतात, पण गुन्ह्याचे धागेदोरे नाहीत!” असा संदेश दिला आहे. सत्य घटनांपासून प्रेरणा घेतलेल्या कथांमधून गुन्ह्यांचा उलगडा करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमात केला जातो.

‘क्राईम पेट्रोल मराठी’ कधी आणि कुठे पाहता येईल?

‘क्राईम पेट्रोल मराठी’ हा कार्यक्रम 26 ऑक्टोबर 2026 पासून सुरू झाला आहे. हा कार्यक्रम सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजता ‘सोनी मराठी’ वाहिनीवर प्रसारित होतो. तसेच, तो ‘सोनी लिव्ह’ या OTT प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध आहे.

काय आहे या कार्यक्रमाचा उद्देश?

गुन्हेगारीबाबत जागरूकता निर्माण करणं, नागरिकांना सतर्क राहण्यासाठी प्रोत्साहित करणं आणि सामाजिक जबाबदारीचं महत्त्व अधोरेखित करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

वास्तविक घटनांपासून प्रेरणा घेतलेल्या कथांमधून धोक्याची चिन्हं ओळखणं, संशयास्पद परिस्थितीबाबत प्रश्न विचारणं आणि इतरांवर विश्वास ठेवताना योग्य ती खबरदारी घेणं याबाबत प्रेक्षकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला जातो.

हेही वाचा – दुःखद बातमी! ‘CID’ चे निर्माते-दिग्दर्शक बी. पी. सिंह यांचे वयाच्या 77व्या वर्षी निधन; कलाविश्वात शोककळा

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर-

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version